पिस्तूलचा धाक दाखवून कापूस व्यापाऱ्याला 7 लाखास लुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 11:50 AM2021-11-24T11:50:23+5:302021-11-24T11:50:56+5:30

सोनाळा येथील कापूस व्यापारी संजय रामकृष्ण पाटील हे बुधवारी सकाळी पहूरकडे येत होते. सोनाळा येथील साठवण तलावाजवळ दोन दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी संजय पाटील यांना अडविले

Cotton trader looted Rs 7 lakh at gunpoint in jalgaon jamner | पिस्तूलचा धाक दाखवून कापूस व्यापाऱ्याला 7 लाखास लुटले

पिस्तूलचा धाक दाखवून कापूस व्यापाऱ्याला 7 लाखास लुटले

googlenewsNext
ठळक मुद्देपहूर पोलिसांनी पाहणी करून पंचनामा केला आहे. याप्रकरणी, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मनोज जोशी
जळगाव - जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात दुचाकीने जाणाऱ्या कापूस व्यापाऱ्याला अडवून त्याच्यावर पिस्तूल रोखले आणि त्याच्याकडील सात लाखांची रक्कम लुटण्यात आली. ही घटना बुधवारी सकाळी ८ वाजता सोनाळा ता. जामनेरनजीक घडली. 

सोनाळा येथील कापूस व्यापारी संजय रामकृष्ण पाटील हे बुधवारी सकाळी पहूरकडे येत होते. सोनाळा येथील साठवण तलावाजवळ दोन दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी संजय पाटील यांना अडविले. त्यांना पिस्तूल व चाकूचा धाक दाखवित मोटारसायकलच्या हॅन्डलला लावलेली बॅग घेवून पळ काढला. या बॅगमध्ये सात लाख रुपयांची रोकड होती. संजय पाटील यांच्यासोबत गावातील तेरा वर्षीय हितेश नाना पाटील हा चिमुकलाही होता. पहूर पोलिसांनी पाहणी करून पंचनामा केला आहे. याप्रकरणी, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
 

Web Title: Cotton trader looted Rs 7 lakh at gunpoint in jalgaon jamner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.