गणेश चतुर्दशीच्या मुहूर्तावर कापूस खरेदीस प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 15:42 IST2024-09-07T15:41:39+5:302024-09-07T15:42:22+5:30

 धरणगाव : नव्या मालास ७१५३ रूपये भाव 

Cotton purchase starts on the occasion of Ganesh Chaturdashi | गणेश चतुर्दशीच्या मुहूर्तावर कापूस खरेदीस प्रारंभ

गणेश चतुर्दशीच्या मुहूर्तावर कापूस खरेदीस प्रारंभ

भगीरथ माळी/ धरणगाव, लोकमत न्यूज नेटवर्क
धरणगाव (जि.जळगाव) : धरणगाव येथे श्री गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापूस खरेदीस प्रारंभ करण्यात आला. नव्या मालाला ७१५३  रुपये एवढा भाव मिळाला आहे. 

जुन्या कापसाला ८ हजार रुपये आणि कवडीमालाला ५१००एवढा भाव मिळणार आहे.  काटा पूजन श्रीजी जिनिंगचे संचालक नयनकुमार गुजराथी, जीवनसिंह बयस, सुरेश चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डी.आर.पाटील, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, भानुदास विसावे,  प्रा. आर. एन. महाजन, मुर्तजा बोहरी यांनी भेट दिली. 
 

नीलेश चौधरी, शिल्पेश सराफ, निखिल बयस, सागर कर्वा, मुकेश  बयस, गजानन साठे, किरण अग्निहोत्री, चेतन कोठारी, दीपक पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Cotton purchase starts on the occasion of Ganesh Chaturdashi

टॅग्स :Jalgaonजळगाव