मनपा महासभा सभागृहातच घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:26 IST2021-02-06T04:26:44+5:302021-02-06T04:26:44+5:30

महापौरांचे प्रधान सचिवांना १६ वे पत्र : ऑनलाईन महासभेत झालेल्या गोंधळानंतर महापौरांचा निर्णय लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्यात ...

The corporation will be held in the general assembly hall | मनपा महासभा सभागृहातच घेणार

मनपा महासभा सभागृहातच घेणार

महापौरांचे प्रधान सचिवांना १६ वे पत्र : ऑनलाईन महासभेत झालेल्या गोंधळानंतर महापौरांचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सर्व सभा या ऑनलाईन पध्दतीने घेण्याचे आदेश शासनाकडे काढले होते. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यातच ऑनलाईन महासभेत येणाऱ्या अडचणी व त्यामुळे निर्माण होणारे वाद पाहता आता मनपाच्या महासभा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय मनपातील सर्व नगरसेवकांनी घेतला होता. त्यानुसार गुरुवारी घेण्यात आलेल्या या निर्णयाचे पत्र महापौर भारती सोनवणे यांनी प्रधान सचिवांना पाठविले आहे. याआधी महासभा ही सभागृहातच घेण्यात यावी यासाठी महापौरांनी प्रधान सचिवांन १५ पत्रे पाठविले असून, हे १६ वे पत्र होते.

बुधवारी मनपाची विशेष सभा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. मात्र, या सभेत इंटरनेटच्या अडचणी आल्यामुळे महासभेची संपूर्ण खिचडी झाली. यामुळे शिवसेनेच्या संतप्त नगरसेवकांनी थेट सभागृहात येऊन ही सभा तहकूब करून सभा ऑफलाईन पध्दतीने घेण्याची मागणी केली होती. सत्ताधारी नगरसेवकांनी देखील हीच मागणी केली होती. तसा निर्णय देखील सर्वानुमते या महासभेत घेण्यात आला. गुरुवारी महापौरांनी या निर्णयाची प्रत जोडून प्रधान सचिवांना पत्र पाठविले असून, मनपाचा निर्णय कळविला आहे. या पत्रात म्हटले आहे की, महासभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत असल्याने इंटरनेट कनेक्टिव्हिटी योग्य नसल्याने अनेक सदस्यांना इतर सदस्यांचे आवाज ऐकू येत नव्हते. काही महिला सदस्यांकडे अँड्रॉईड मोबाईल नसल्याने त्यांना सभेत सहभागी होण्यास अडचण येते. सर्व सदस्यांच्या तक्रारी लक्षात घेता पुढील महासभा ऑफलाईन पध्दतीने घेण्यात यावी असा निर्णय सर्व सदस्यांनी घेतला. या निर्णयानुसार ऑफलाईन सभेस परवानगी देण्याची मागणी देखील महापौरांनी केली आहे.

Web Title: The corporation will be held in the general assembly hall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.