मोबाइल टॉवरधारकांकडे मनपाचे आठ कोटी थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:29 AM2021-03-04T04:29:10+5:302021-03-04T04:29:10+5:30

जळगाव : मनपा प्रशासनाची १५८ मोबाइल टॉवरधारकांकडे गेल्या चार वर्षांपासून आठ कोटी रुपयांची थकबाकी आहे. मनपाकडून अनेकवेळा मोबाइल टॉवरधारकांना ...

Corporation owes Rs 8 crore to mobile tower owners | मोबाइल टॉवरधारकांकडे मनपाचे आठ कोटी थकले

मोबाइल टॉवरधारकांकडे मनपाचे आठ कोटी थकले

Next

जळगाव : मनपा प्रशासनाची १५८ मोबाइल टॉवरधारकांकडे गेल्या चार वर्षांपासून आठ कोटी रुपयांची थकबाकी आहे. मनपाकडून अनेकवेळा मोबाइल टॉवरधारकांना नोटीस बजावूनदेखील ही थकबाकीची रक्कम भरलेली नाही, तर यापैकी काही टॉवरधारकांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे ही वसुली थांबली आहे. त्यामुळे दरवर्षी मनपाला मोबाइल टॉवरमधून उत्पन्न मिळत नसल्याने मनपाचे उद्दिष्टामध्ये तूट निघत आहे. दरम्यान, उर्वरित २५ ते ३० मोबाइल टॉवरधारकांना मनपाकडून नोटीस बजावण्यात आल्या असून, तीन दिवसात आपल्याकडील थकीत रक्कम भरण्याचा सूचना दिल्या आहेत. दरम्यान, शहरभरात १०३ टॉवर अनधिकृत असून, यावर आतापर्यंत मनपा प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच कंपन्यांकडून केबलसाठी व खांबासाठी, रस्त्याच्या खोदकामासाठी कोणतीही परवानगी घेतली जात नाही. अनधिकृत टॉवरमुळे मनपाचेही आर्थिक नुकसान होत आहे.

Web Title: Corporation owes Rs 8 crore to mobile tower owners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.