शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

भुसावळात नगरसेविकेस मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 5:24 PM

पालिका निवडणुकीमध्ये पराभूत झाल्याचा राग मनात ठेवून माजी नगरसेविका नंदा निकम यांचे पती प्रकाश निकम यांच्यासह आठ जणांंनी घरात घुसून मारहाण केल्याची घटना २८ रोजी रात्री घडली.

ठळक मुद्देनिवडणुकीतील पराभवाची सलतीन वर्षांनंतर घरात घुसून नगरसेविकेला केली मारहाणरिव्हॉल्व्हर व अन्य हत्यारांसह दहशतआठ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल

भुसावळ, जि.जळगाव : नगरपालिका निवडणुकीमध्ये पराभूत झाल्याचा राग मनात ठेवून माजी नगरसेविका नंदा निकम यांचे पती प्रकाश निकम यांच्यासह आठ जणांंनी घरात घुसून मारहाण केल्याची घटना २८ रोजी रात्री घडली. याबाबतची फिर्याद नगरसेविका पूजा राजू सूर्यवंशी (रा.संभाजीनगर) यांनी दिली. त्यावरून आठ जणांंविरुद्ध बाजारपेठ पोलिसात दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे.पोलीस सूत्रांनुसार, गेल्या तीन वर्षांपूर्वी झालेल्या पालिका निवडणुकीमध्ये माजी नगरसेवक नंदा निकम या निवडणुकीत उभ्या होत्या. त्यावेळी त्यांच्याविरुद्ध विद्यमान नगरसेविका पूजा राजू सूर्यवंशी यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत पराभूत झाल्याचा राग मनात ठेवून माजी नगरसेविका निकम यांचे पती प्रकाश निकम, विनोद निकम, आकाश निकम, हेमंत निकम, रामदास निकम, अंकुश निकम , शिवा ज्ञानसिंग, आनंद नरवाडे आदींनी २८ रोजी रात्री साडेसातला नगरसेविका सूर्यवंशी यांचे पती राजू सूर्यवंशी यांना मारण्याच्या हेतूने हातात तलवार, पिस्तोल, लोखंडी रॉड घेऊन घरात शिरले.यावेळी प्रकाश निकम यांनी फिर्यादी नगरसेविका पूजा सूर्यवंशी यांच्या कानशिलात मारली व तुझ्या पतीस जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली, अशी फिर्याद नगरसेविका सूर्यवंशी यांनी दिली आहे.त्यावरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४५१/१९, भा.दं.वि. कलम ४५२, ३२३ यासह इतर कलमे व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर व घटस्थापनेच्या मुहूर्तावर ही घटना घडल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळ