CoronaVirus : कोरोना कक्षातील संशयिताचा मृत्यू तर एका बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचे अहवाल 'निगेटिव्ह' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 13:33 IST2020-03-31T13:16:47+5:302020-03-31T13:33:45+5:30

CoronaVirus : मृत रुग्णाच्या लाळेचे नमुने औरंगाबाद येथे प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविले आहे, त्याचा अहवाल येणे अद्याप बाकी आ

CoronaVirus: Suspected death in Corona cell, reports of contact with an infected patient 'Negative' | CoronaVirus : कोरोना कक्षातील संशयिताचा मृत्यू तर एका बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचे अहवाल 'निगेटिव्ह' 

CoronaVirus : कोरोना कक्षातील संशयिताचा मृत्यू तर एका बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचे अहवाल 'निगेटिव्ह' 

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल 52 वर्षीय संशयिताचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. या संशयिताचा अहवाल येणे अद्याप बाकी असून तो आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.  या संशयिताला सोमवारी संध्याकाळी 6 वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान रात्री 11 वाजता त्याचा मृत्यू झाला.

या रुग्णाच्या लाळेचे नमुने औरंगाबाद येथे प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविले आहे, त्याचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे. मात्र तत्पूर्वीच या संशयितांचा मृत्यू झाला. त्यामुळे मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.  या संशयिताचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली.

जळगावकरांना मोठा दिलासा, कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील सर्व जणांचे अहवाल निगेटिव्ह 26 अहवाल प्राप्त

जळगाव येथे आढळून आलेल्या 49 वर्षीय कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहे.  जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल 49 वर्षीय इसमाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांनतर त्याच्या संपर्कातील 24 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात येऊन त्यांच्या लाळेचे नमुने औरंगाबाद येथे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. त्यांचा अहवाल मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मिळाला. या 24 जनांसह इतर 2 असे 26 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. यामुळे जळगावकारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Web Title: CoronaVirus: Suspected death in Corona cell, reports of contact with an infected patient 'Negative'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.