CoronaVirus News : Shiv sena leader Gulabrao Patil comment on Narayan Rane for demands Presidents rule in the state rkp | नारायण राणे सेनेमुळेच मोठे झाले अन् रस्त्यावरही आले - गुलाबराव पाटील

नारायण राणे सेनेमुळेच मोठे झाले अन् रस्त्यावरही आले - गुलाबराव पाटील

ठळक मुद्दे"कोरोना हा काही महाराष्ट्राने आणलेला नाही. सर्वत्र जगात व देशात हा संसर्ग पसरला आहे. ही आपत्ती आहे, त्याला सामोरे गेले पाहिजे."

जळगाव : नारायण राणे यांचे शिवसेनेशी जुने नाते आहे. ते सेनेमुळेच मोठे झाले आणि सेनेमुळेच रस्त्यावरही आले. त्यामुळे त्यांचे नाते प्रेमाचे पण आहे, असा चिमटा राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंगळवारी नारायण राणेंना जळगावात काढला. 

कोरोना या संसर्गजन्य आजाराने देशावर मोठी आपत्ती निर्माण केली आहे. या परिस्थितीत सर्वांनी एकत्र येऊन लढा उभारण्याची गरज आहे. राष्ट्रपती लागवट लागू करायची असेल गुजरात, दिल्ली व उत्तर प्रदेशातही करावी लागेल. मात्र या काळातही काही जण राजकारण करीत असल्याचे टोलाही यावेळी गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे यांना लगावला आहे.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरल्याने राज्यात राष्ट्रपती लागवट लागू करण्याची मागणी केली होती. त्यावर मंगळवारी गुलाबराव पाटील यांनी ही राजकारण करण्याची वेळ नसून आपत्तीच्या काळात एकत्र येण्याची वेळ असल्याचे मत व्यक्त केले. 

कोरोना हा काही महाराष्ट्राने आणलेला नाही. सर्वत्र जगात व देशात हा संसर्ग पसरला आहे. ही आपत्ती आहे, त्याला सामोरे गेले पाहिजे. काही त्रुटी असतील तर त्याला सामोरे गेले पाहिजे. राष्ट्रपपती लागवट लावावीच असेल तर गुजरात, उत्तर प्रदेश व दिल्ली पण आहे, तेथेही लावावी लागेल. शिवसेनेशी राणे यांचे जुने नाते आहे, सेनेमुळेच ते मोठे झाले अन् सेनेमुळेच ते रस्त्यावर आले असाही चिमटा पाटील यांनी काढला.

आणखी बातम्या...

"ऐका डॉक्टरांच्या व्यथा, पालिकेतील सत्ताधीशांच्या नाकर्तेपणाच्या कथा!"

CoronaVirus News : कोरोनाचे सावट; मुंबईतील 'या' मंडळाचा यंदाचा गणेशोत्सव रद्द!

चीनच्या हालचालींचा सॅटेलाइट पुरावा; LACजवळ तैनात केले १००० सैनिक!

Web Title: CoronaVirus News : Shiv sena leader Gulabrao Patil comment on Narayan Rane for demands Presidents rule in the state rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.