जळगाव जिल्ह्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 12:12 IST2020-04-19T12:12:12+5:302020-04-19T12:12:59+5:30
तपासणी अहवाल नुकताच प्राप्त झाला असून त्यांचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला आहे

जळगाव जिल्ह्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पहिला कोरोना पोसिटिव्ह रुग्ण बरा होऊन घरी परतण्यास तीन दिवस होत नाही तोच जिल्ह्यात आणखी एक कोरोना पोसिटीव्ह रुग्ण आढळून आला आहे.
अमळनेर येथील 60 वर्षीय महिलेला शुक्रवारी जळगाव येथे कोरोना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा स्वॅब घेऊन तपासणीसाठी शुक्रवारीच पाठविण्यात आला होता.
तपासणी अहवाल नुकताच प्राप्त झाला असून त्यांचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. भास्कर खैरे यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील कोरोना पोसिटीव्हचा हा तिसरा रुग्ण आहे. मात्र कोरोनाचा पहिला रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.