शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भुसावळात कोरोनाचा कहर, गर्दी टाळण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 23:18 IST

भुसावळात कोरोनाचा कहर असताना नागरिकांनी गंभीरपणे घेण्याची गरज आहे.

उत्तम काळेभुसावळ, जि.जळगाव : शहरात गेल्या चार ते पाच दिवसापासून पॉझिटिव रुग्णांची संख्या आठ झाली आहे. यातील दोन रुग्ण मयत झाले असून, सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे शहरवासीयांना विशेष दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.दरम्यान, याच काळात रेशनिंग दुकानांवर धान्य उपलब्ध झाले  आहे. त्यामुळे धान्य घेण्यासाठी नागरिक बाहेर पडत असले, तरी हे धान्य वाटप तब्बल १० दिवस सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये, असे मत जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.शहरातील समता नगर, आंबेडकर नगर, पंचशील नगर, सिंधी कॉलनी व शांतीनगर या भागात तब्बल आठ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले. यातील पंचशील नगर व आंबेडकर नगरमधील प्रत्येकी एक - एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मात्र तरीही शहरात सहा रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे शहरातील हा परिसर सील करण्यात आला आहे. कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी राज्यासह शहरात लॉकडाऊन सुरू करण्यात आले आहे.  सुरवातीचे चार-पाच दिवस वगळता शहरात सर्वत्र भाजी मार्केट, दुकाने आदींमध्ये गर्दी दिसून आली. यावेळी १४४ कलमाचे उल्लंघन केल्यामुळे पोलिसांनी १८८ प्रमाणे अनेकांवर गुन्हे दाखल केले.  मात्र तरीही गर्दी आटोक्यात आणण्यात पोलिसांना अपेक्षित यश आले नाही. त्यात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यावरसुद्धा शहरातील नागरिक रस्त्यावर येणे थांबले नाही. त्यामुळे शहरात तीन दिवस बंद पाळावे, अशी गरज निर्माण झाली व तसा  मतप्रवाह पुढे आला. मात्र यातही शहरात राजकारण झाल्यामुळे शहरवासीय संभ्रमात पडले.दरम्यान , याच काळात रास्त भाव  दुकानावर  शासनातर्फे प्रथमत: गुलाबी रेशनिंग कार्डवर गहू व तांदूळ वाटप सुरू झाले.  मात्र हे वाटप किमान दहा-दहा दिवस तर सुरु राहणार आहे. मात्र त्यानंतरही राहिलेल्या ग्राहकांना लाभार्थ्यांना द्यावे लागणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र तरीही शहरात हे रेशनिंग  मिळते किंवा नाही, असा संभ्रम निर्माण झाल्यामुळे काही नागरिक जीव धोक्यात टाकून रेशन धान्यासाठी  रस्त्यावर उतरले.धान्य साठ्या यासंदर्भात   पुरवठा अधिकारी अनभिन्नशहरात रेशनिंगची १२० दुकाने आहेत. या दुकानवर भगव्या रेशन कार्डावर वाटप करण्यासाठी गहू व तांदूळ आला आहे. मात्र गोडावूनमध्ये गहू व तांदूळ किती आला,  यासंदर्भात तहसीलदार दीपक धिवरे व पुरवठा अधिकारी अतुल नागरगोजे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांना त्यासंदर्भात माहिती नसल्याचे सांगण्यात आले . तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांना धान्य वाटप किती करायचे हे माहीत नसल्यामुळे नागरिक चकीत झाले आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात गोडाऊनमधूनच जाणाऱ्या थैल्या कमी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी तक्रारी केली होती. त्यावरून पुरवठा विभाग वादात सापडला आहे. त्यात अद्यापही पुरवठा अधिकारी अतुल नागरगोजे यांना धान्यासंदर्भात  माहिती नसल्यामुळे जिल्हा परिषद सदस्या सावकारे यांच्या तक्रारींमध्ये  दम असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBhusawalभुसावळ