‘कोरोना’ संशयीत आढळले तीन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 22:34 IST2020-03-20T22:34:15+5:302020-03-20T22:34:22+5:30
चिंता : वरणगाव, यावल आणि मुक्ताईनगरात खळबळ

‘कोरोना’ संशयीत आढळले तीन रुग्ण
भुसावळ : विभागातील तीन ठिकाचे कोरोना संशयीत रुग्ण शुक्रवारी आढळल्याने खळबळ उडाली आहे.
बसमधून वरणगाव येथे
उतरला एक जण
वरणगाव पुुणे बसमध्ये शुक्रवारी प्रवास करणाऱ्या एका कोरोनाच्या संशयीत रुग्णास बस थांबवून वरणगाव येथून जळगाव रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. शुक्रवार रोजी एका खाजगी कंपनीच्या बसने पुणे ते मलकापूर प्रवास करीत असतांना बसमधील एका प्रवाशास शिंका व खोकला येत असल्याचे इतर प्रवाशांच्या लक्षात आले होते पंरतु बस वरणगाव जवळ आली असता त्या संशयीत प्रवाशास श्वास घेण्यास अडचण होत असल्याचे निदर्शनास येताच बस थांबूवन या रुग्णाची माहिती ग्रामीण रुग्णालयास देण्यात आली. यावेळी तत्काळ रूग्णवाहिका पाठवून त्या व्यक्तीवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नंतर वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे हलविण्यात आले.
यावल येथे आला मुंबईचा युवक
यावल: मुंबई येथून शहरात आलेल्या एका संशयीत कोरोनाग्रस्त २८ वर्षीय युवकाची येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक तपासणी करून त्याला जळगावला तातडीने पाठवण्यात आले आहे. हा युवक ज्या सहकाऱ्यांच्या सानिध्यात राहत होता त्यातील एक संशयीत रुग्न असल्याने त्याचा साथीदार म्हणून येथील युवकाचे नाव समोर येताच मुख्याधिकारी बबन तडवी व आरोग्य निरीक्षक शिवानंद कानडे यांना मुबईवरून माहिती मीळताच पो. . नि. अरूण धनवडे व यांना सुचना देत त्या तरूणाचा शोध घेवून येथील ग्रामीण रुग्नालयात तपासणी करून त्यास पुझील चाचणीसाठी जळगावला पाठवण्यात आले.
मुक्ताईनगरचा कोरोना संशयित विद्यार्थी दाखल
मुक्ताईनगर : कझाकिस्तान येथून परतलेल्या मुक्ताईनगर येथील एका २२ वर्षीय विद्याथ्यार्ला सर्दी व खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने त्याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील कोरोना कक्षात दाखल करण्यात आले आहे़ या तरूणाच्या लाळेचे नमूने घेऊन ते पुणे येथे पाठविण्यात आले असून तपासणी अहवाल शनिवारी सायंकाळ पर्यंत येण्याची शक्यता आहे़ हा
तरूण १७ मार्च रोजी परतला असून शुक्रवारी त्याला दाखल करण्यात आले आहे़