कोरोना अजूनही सक्रिय- वार्तापत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:17 IST2021-07-31T04:17:56+5:302021-07-31T04:17:56+5:30
चाळीसगाव तालुक्यात आतापर्यंत एकूण नऊ हजार ९३५ कोरोनाबाधित, तर १२६ जणांनी प्राण गमावले आहेत. चाळीसगाव तालुक्यात कोरोनामुक्तीचा टिळा कधी ...

कोरोना अजूनही सक्रिय- वार्तापत्र
चाळीसगाव तालुक्यात आतापर्यंत एकूण नऊ हजार ९३५ कोरोनाबाधित, तर १२६ जणांनी प्राण गमावले आहेत. चाळीसगाव तालुक्यात कोरोनामुक्तीचा टिळा कधी लागणार याकडे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात इतर सर्व तालुक्यांत कोरोना रुग्णांचा वेग कमालीचा मंदावत असताना चाळीसगाव तालुक्यात मात्र कोरोना पाठ सोडण्यास तयार नाही असे चित्र आहे. दररोज ही संख्या वाढतच आहे. त्यामुळे सर्वांची चिंता वाढली आहे.
चाळीसगाव तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना याबाबत खबरदारी घेतली जात नसल्याचे पहावयास मिळत आहे. पहिल्या टप्प्यात गल्लोगल्लीमध्ये फवारणी करण्यात आली होती. दुसऱ्या टप्प्यात रुग्ण संख्या वाढली असतानाही अनेक भागामध्ये फवारणी पहायलाही मिळाली नाही. स्वच्छता, साफसफाई केली जात नाही. यासारखे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्ण कमी होत असल्याने प्रशासनाने निर्बंध शिथिल केले. नागरिकांकडून बेफिकिरी वाढली आहे. मास्कचा तर जणू विसरच पडला आहे. याबाबत तालुक्यातील प्रशासन गप्पगार असून, नागरिकांना कसलाच धाक व भीती राहिली नाही नसल्याने भर रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी अजूनही मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. ना मास्क, ना सोशल डिस्टन्स, विविध कार्यक्रमांना तोबा गर्दीवर ना नियंत्रण या सर्व कारणांमुळे कोरोनाला उतरणीचा पुन्हा सक्रिय झाला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ठोस उपाययोजना जात नसल्याने रुग्णसंख्या येथे दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कारवाई शिथिल झाल्याने नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. त्यासाठी प्रशासनाने पुन्हा एकदा सक्रिय होऊन उपाययोजना करण्याची गरज आहे.