कोरोनाचा संसर्ग थांबता थांबेना ! आणखी ७५ कोरोना बाधित रूग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 18:39 IST2020-06-13T18:39:14+5:302020-06-13T18:39:25+5:30
जळगाव : राज्यासह जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे. दिवसागणित कोरोना लागण झालेल्या रूग्णांचा आकडा हा वाढत ...

कोरोनाचा संसर्ग थांबता थांबेना ! आणखी ७५ कोरोना बाधित रूग्ण आढळले
जळगाव : राज्यासह जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे. दिवसागणित कोरोना लागण झालेल्या रूग्णांचा आकडा हा वाढत असून परिस्थिती आवाक्यात आणत असताना प्रशासनाचे धाबे दणाणले आहे़ एका बाजूला आकडा वाढत असताना, दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही समाधानकार आहे.दरम्यान, स्वॅब घेतलेल्या संशयित व्यक्तींचा शनिवारी अहवाल प्राप्त झाला असून त्यात पुन्हा नवीन ७५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये यावल १७, चोपडा १६, जळगाव ग्रामीण ०७ तसेच जळगाव शहर, धरणगाव, पारोळा प्रत्येकी ०६, रावेर ०५, अमळनेर ०४, भडगाव ०३, भुसावळ ०२, एरंडोल, जामनेर, मुक्ताईनगर प्रत्येक ०१ रूग्णांचा रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या १६६३ इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
अशी आहे बाधितांची संख्या
भुसावळ - ३०३
जळगाव शहर - २९७
अमळनेर - २२१
चोपडा- ११८
रावेर - ११६
भडगाव - ९२
यावेल - ८९
जामनेर - ८०
धरणगाव - ८०
पारोळा- ७६
जळगाव ग्रामीण- ५२
एरंडोल - ४३
पाचोरा- ४१
चाळीसगाव - १७
बोदवड- १२
मुक्ताईनगर - ११
बाहेरील जिल्ह्यातील- ०४