अमळनेर येथील कोरोना बाधित तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 23:26 IST2020-05-06T23:26:02+5:302020-05-06T23:26:39+5:30
मृतांची संख्या १४ वर, अमळनेरातील ७ वा मृत्यू

अमळनेर येथील कोरोना बाधित तरुणाचा मृत्यू
जळगाव : अमळनेर येथील कोरोना बाधित ३६ वर्षीय तरुणाचा बुधवारी सायंकाळी मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधित मृतांची संख्या आता १४ झाली आहे. अमळनेरमधील हा ७ वा मृत्यू आहे.
या तरुणाला मंगळवारी कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि सायंकाळीच त्याचा मृत्यू झाला. या रुग्णाला हृदयविकार होता, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली.