शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
3
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
4
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
5
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
6
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
7
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
8
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
9
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
10
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
11
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
12
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
13
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
14
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
15
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
16
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
17
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
18
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
19
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
20
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळातही तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या ३५ दलालांचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:58 IST

रेल्वे तिकिटांच्या काळाबाजार करणाऱ्यांविरोधात भुसावळ रेल्वे सुरक्षा दलातर्फे कारवाई मोहीम सुरूच असते. मात्र, कोरोना काळात ज्या विशेष रेल्वे ...

रेल्वे तिकिटांच्या काळाबाजार करणाऱ्यांविरोधात भुसावळ रेल्वे सुरक्षा दलातर्फे कारवाई मोहीम सुरूच असते. मात्र, कोरोना काळात ज्या विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. त्या गाड्यांचे प्रवाशांना तत्काळ आरक्षित तिकीट मिळवून देण्यासाठी जळगाव, भुसावळ, नाशिक या ठिकाणी दलालांचा चांगलाच सुळसुळाट झाला होता. आयआरटीसीचे अधिकृत एजंट असतानाही तिकिटांचा का‌‌ळाबाजार करणारे हे दलाल फेक आयडी आणि वेगवेगळ्या नावांच्या बवानट ओळखपत्राद्वारे तिकिटांचा काळाबाजार करीत असल्याचे रेल्वे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते. त्यानुसार रेल्वे पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून तिकिटांचा काळाबाजार करताना विविध ठिकाणांहून ३५ दलालांना रंगेहाथ अटक केली आहे. या दलालांमध्ये बहुतांश युवक असून, सायबर क्षेत्रात हे युवक मास्टर माईंड असल्याचे समोर आले आहे. कारवाईनंतरही या युवकांवर रेल्वे पोलिसांचे विशेष लक्ष असून, या प्रकाराला पूर्णत: आळा घालण्यासाठी भुसावळ वाणिज्य विभागाने रेल्वे सुरक्षा बलाचे विशेष गुप्त वार्ता पथकही नियुक्त केले आहे.

इन्फो :

सहा महिन्यात ३५ दलालांचा पर्दाफाश

भुसावळ वाणिज्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार भुसावळ विभागात जुलै २०२० ते ३१ जानेवारी २०२१ दरम्यान विविध स्टेशनवरून ३५ दलालांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक नाशिक, जळगाव, भुसावळ व अकोला येथे कारवाया करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या दलालांकडून बनावट आयडी कार्ड, लॅपटॉप, विविध कंपन्यांचे मोबाइल सीम, स्कॅनर आदी साहित्य जप्त करून, सुमारे १० लाखांची तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये एकूण ३० गुन्हे दाखल असून, अटक झालेल्या दलालांना न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेनुसार जेलची हवाही खावी लागली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

इन्फो :

एक लाखांचा दंड वसूल

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांना अटक केल्यानंतर त्यांना रेल्वेच्या भुसावळ किंवा मनमाड येथील न्यायालयात हजर केले जाते. न्यायालयातर्फे चोरीचे प्रमाण लक्षात घेऊन रेल्वेचे नुकसान केल्याप्रकरणी योग्य ती शिक्षा ठोठावून दंड वसूल केला जातो. आतापर्यंत सापडलेल्या ३५ दलालांकडून एकत्रित एक लाखाचा दंड वसूल करण्यात आला आहे.

इन्फो :

रेल्वे प्रशासनातर्फे तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी कडक पाऊले उचलली असून, रेल्वेच्या सुरक्षा बल व वाणिज्य विभागातर्फे अशा दलालांवर कडक ‘वॉच’ आहे.

प्रवाशांनी अधिकृत एजंटकडूनच तिकीट बुकिंग करणे गरजेचे असून, जे कोणी तिकिटांचा काळाबाजार करण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यावर रेल्वेच्या नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल.

-युवराज पाटील, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक, भुसावळ रेल्वे विभाग.

इन्फो :

जुलै २०२० ते ३१ जानेवारी २०२१ दरम्यानची कारवाई

सापडलेले दलाल : ३५

गुन्हे दाखल : ३०

तिकिटांची रक्कम : १० लाख २ हजार रुपये

दंड वसूल : १ लाख रुपये