शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

सालारनगर, कंजरवाड्यात कोरोनाचा विस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 12:05 PM

शहरात नवे १७ रुग्ण : सालारनगरातील ८ जणांचा समावेश, कंजरवाड्यातील एकाच कुटुंबातील चार बाधित

जळगाव : शहरातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असताना गुरूवारीही शहरात कोरोनाचे १७ नवीन रुग्ण आढळून आले़ यातील सालार नगरातील ८ व कंजरवाडा (जाखणीनगर) येथील एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे़ हे बाराही रुग्ण बाधित रुग्णांच्या संपर्कातील असून त्यांना आधीच क्वारंटाईन करण्यात आले होते़ यासह ग्रामीण भागात कुसुंबा व उमाळा येथे नवीन रुग्ण तर विटनेर येथे बाधिताच्या संपर्कातील एक असे तीन रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत़कोळीवाडा येथे एक महिला, डहाके नगर मध्ये पुरूष, दक्षता नगरात एक तर तांबापूरात बाधित मृताच्या संपर्कातील दोघे पॉझिटीव्ह आढळून आलेले आहे़ उमाळा येथील महिला व विटनेर येथील बाधित डॉक्टर दाम्पत्याच्या संपर्कातील एक व भोकर येथील मृत बाधिताच संपर्कातील तीन जण पॉझिीटीव्ह आढळून आलेले आहेत़ यासह कुसुंबा येथील ४८ वर्षीय प्रौढही कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला आहे़ त्यामुळे जळगावच्या ग्रामीण भागातील रुग्णसंख्या १४ वर पोहचली आहे़कंजरवाड्यात पुरेशा प्रमाणात उपाय होईनाकंजरवाड्यात बाधित वृद्धाच्या संपर्कातील त्याचे चारही नातेवाईक पॉझिटीव्ह आले आहेत़ यात ४ वर्षाचा मुलगा, ८ वर्षाची मुलगी, ३६ वर्षाची महिला व ३९ वर्षाचा तरूणाचा समावेश आहे़ दरम्यान, पहिला बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर कंजरवाडा येथे पुरेशा प्रमाणात उपाययोजना राबविण्यात आल्या नव्हत्या अशा तक्रारी समोर आल्या होत्या़ यातून संसर्ग वाढण्याचा धोका असल्याचे बोलले जात होते़ प्रशासनाने या दाट वस्तीच्या भागाकडे अधिक लक्ष द्यावे, अशी मागणी समोर येत आहे़सालारनगरात संसर्ग वाढलासालारनगरात ८ रुग्णांपैकी दोन पुरूष, तीन लहान मुले व तीन महिलांचा समावेश आहे़ यात २९ वर्षीय तरूण, ३३ वर्षीय तरूण, ८ वर्षाचा मुलगा, २८ वषीय महिला, २३ वर्षीय तरूणी, ७ वर्षांची मुलगी, २७ वर्षांची महिला, १२ वर्षांचा मुलगा यांचा समावेश आहे़ हे सर्व रुग्ण कोविड सेंटरमध्ये आधीच क्वारंटाईन आहेत.२५ जणांना डिस्चार्जगुरूवारी कोरोनातून मुक्त झालेल्या २५ जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ़ राम रावलानी यांनी दिली़ एका दिवसात सर्वाधिक कोरोनावर मात केलेल्यांना घरी सोडण्यात आले़ यामुळे शहराला काहीसा दिलासा मिळणार आहे़कंजरवाड्यात सायंकाळी घेतला मृत वृद्धाचा स्वॅबकंजरवाड्यात दोन जणांचा गुरूवारी मृत्यू झाला़ यातील एका ५० वर्षीय प्रौढाला रुग्णालायात दाखल केल्यानंतर तर एका ६५ वर्षीय वृद्धाचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला़ मात्र, यापैकी कोणाचेही कोविड रुग्णालयात नमुने तपासणीसाठी घेण्यात आले नव्हते व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात सोपविण्यात आले होते़ यापैकी ५० वर्षीय प्रौढाचा मृत्यू हा यकूत खराब असल्याने झाल्याचे सांगत निकषात बसत नसल्याने नमुने घेण्यात आलेले नाही, असे स्पष्टीकरण रुग्णालयाकडून देण्यात आले़ मात्र, दुसऱ्या वृद्धाच्या मृत्यूच्या बाबतीत नागरिकांनी तक्रार केल्यानंतर अखेर सायंकाळी महापालिकेच्या पथकाने घरी जावून या मृत वृद्धाचे स्वॅब घेतले़ दोघेही मृत व्यक्ति या आधी बाधित आढळून आलेल्या वृद्धाच्या शेजारी राहत होते़ त्यानंतर नागरिकांनी तक्रार केल्या, काही प्रमाणात गोंधळाचेही वातावरण निर्माण झाले होते़ अखेर महापालिकेच्या प्रशासनाने सायंकाळी हे स्वॅब घेतले व तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे़ यातील ५० वर्षाच्या प्रौढावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते़ दरम्यान, नातेवाईकांनी शवविच्छेदनाची मागणी केली होती़ मात्र, रुग्णालयाने ती न मान्य करता मृतदेह प्लॅस्टीकच्या बॅगमध्ये सोपवून दिल्याचे सांगण्यात येत आहे़बाधिताच्या पत्नीचे रुग्णालयातून रात्री पलायनशिरसोली ता. जळगाव : शिरसोली येथील बारी नगरात बुधवारी बाधित रुग्ण आढळल्यानंतर त्याची पत्नी व इतर सात नातेवाईकांना बुधवारी रात्रीच कोविड रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र या महिलेने रात्री १० वाजेच्या सुमारास शिरसोली गाठल्याने अधिकच भिती पसरली. सकाळी हा प्रकार सकाळी पोलीस पाटील व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला. त्यांनी लागलीच रुग्णवाहिका बोलावून या महिलेची कोविड रुग्णालयात रवानगी केली. ही महिला रात्री घरी कशी परतली याबाबत चर्चा सुरु झाली आहे.महिलेचे मुंबईहून उपचारउमाळा येथील ५२ वर्षीय महिलेला कर्करोग असून या महिलेचे मुंबई येथे उपचार सुरू होते़ महिला चेंबूर येथे त्यांच्या नातवाईकांकडे राहिली होती़ त्यांचे नातेवाईक बाधित आढळून आले होते़ महिलेला जळगावात क्वारंटाईन करण्यात आले होते़ गुरूवारी अहवाल प्राप्त झाले़८६१ अहवालांची प्रतीक्षाजिल्हाभरात प्रलंबीत अहवालांची संख्या वाढतच आहे़ त्यात गुरूवारी ८९२ लोकांची नमुने तपासणीसाठी घेण्यात आले़ त्यामुळे एकत्रित ८६१ अहवाल प्रलंबीत आहेत़ त्यामुळे प्रयोगशाळेवरील भार अधिकच वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आह़े विविध हॉटस्पॉट ठरलेल्या भागात तपासणीची संख्या वाढविली आहे़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव