Ganesh Chaturthi 2018 : जळगावात गणपतीच्या वर्गणीतून साईबाबांच्या मंदिराचा कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 12:26 PM2018-09-20T12:26:45+5:302018-09-20T12:30:02+5:30

जिल्हा रुग्णालय परिसरातील स्तूत्य उपक्रम

Conversion of Saibaba temple | Ganesh Chaturthi 2018 : जळगावात गणपतीच्या वर्गणीतून साईबाबांच्या मंदिराचा कायापालट

Ganesh Chaturthi 2018 : जळगावात गणपतीच्या वर्गणीतून साईबाबांच्या मंदिराचा कायापालट

Next
ठळक मुद्देनिवासस्थान पाडल्यानंतरही गणेशोत्सवात खंड नाहीगणरायाच्या लहान मूर्तीची स्थापना

जळगाव : जिल्हा रुग्णालयातील निवासस्थाने पाडल्यानंतर तेथे कोणीही राहत नसले तरी गणेशोत्सवात खंड पडू न देता कर्मचाऱ्यांनी यंदाही लहानशा गणपती मूर्तीची स्थापना केली आहे. यासाठी जमा झालेली वर्गणी सत्कारणी लावण्यासाठी येथील गणेशभक्तांनी रुग्णालय परिसरात असलेल्या श्री इच्छापूर्ती साई गणेश मंदिराचा कायापालट केला आहे.
जिल्हा रुग्णालय परिसरातील निवासस्थानांमध्ये राहणाºया कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांच्यावतीने गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा रुग्णालय परिसरात गणेशोत्सव साजरा केला जात होता. यामध्ये कर्मचाºयांसह त्यांचे कुटुंब उत्साहाने सहभागी होऊन गणरायाची पूजा-अर्चा करीत असत. मात्र जिल्हा रुग्णालय परिसरातील निवासस्थाने जीर्ण झाल्याने ती पाडण्यात आली. त्यानंतर हा पहिलाच गणेशोत्सव आला. आता निवासस्थानातील रहिवासी नसल्याने यंदा गणेशोत्सवात खंड पडतो की काय असे अनेकांना वाटत होते, मात्र दरवर्षी जे कर्मचारी वर्गणी देत असत त्यांनी यंदाही वर्गणी दिली. वर्गणी जमा झाली तरी निवासस्थानात कोणी नसल्याने गणरायाची देखभाल, पूजा-अर्चा कोण करणार असा प्रश्न होता. त्यासाठी सर्वांनी एकमत करीत गणरायाची लहान मूर्ती स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
....अन् साईबाबा मंदिराचे पालटले रुप
गणरायाची लहान मूर्ती स्थापन करून गणेशोत्सवात खंड तर पडू दिला नाही, मात्र जमा झालेल्या निधीचे काय करावे, असा प्रश्न होता. त्यासाठी जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी बापू बगलाणे यांनी पुढाकार घेत रुग्णालय परिसरातील श्री इच्छापूर्ती साई गणेश मंदिराला रंगरंगोटी करण्यासह फरशी, टाईल्स बसविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली व मंदिराचा कायापालट झाला.
२००६मध्ये हे मंदिर बांधलेले असून त्या ठिकाणी रुग्णाचे अनेक नातेवाईक येऊन जेवण करतात व विसावा घेतात. मात्र त्यांना अधिक व व्यवस्थित जागा मिळावी याचाही आता काम करताना विचार करण्यात आला.
कर्मचाºयांनी वेगवेगळ््या ठिकाणी जावून चांगल्या दर्जाची व आकर्षक टाईल्स आणून मंदिरात ती बसवून रंगरंगोटी केली. या सोबतच परिसरात हॅलोजन दिवे (लाईट) बसविण्यासह आकर्षक रोशनाई करण्यात आली. यामुळे मंदिर उजळून निघाले असून याच ठिकाणी गणरायाच्या लहान मूर्तीची स्थापना केली आहे.
मंदिराच्या समोर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी फरशी बसलविण्यात आली असून बाकडे तयार करण्यात आले. त्याचा रुग्णांना मोठा फायदा होत असून गणपतीच्या वर्गणीतून जमा झालेल्या रकमेचा सद्पयोग केल्याबद्दल रुग्णाचे नातेवाईकही या उपक्रमाचे कौतूक करीत आहेत.
रुग्णवाहिका चालक करतात देखभाल
साईबाबा मंदिरात गणरायाची स्थापना केल्यानंतर यंदा १०८ रुग्णवाहिकेचे चालक राजू पाटील व त्यांचे सहकारी गणरायाची पूजा-अर्चना करीत आहे.
गणरायाच्या वर्गणीतून साईबाबांच्या मंदिराच्या कामासाठी बापू बगलाणे यांच्यासह जितेंद्र करोसिया, अनिल सपकाळ, सुधीर करोसिया, मंगेश बोरसे, दिलीप सुरवाडे, प्रवीण कोल्हे, गोपी चिरामंडे, चेतन छजलाणे, सुभाष सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Conversion of Saibaba temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.