Construction workers' march for various demands | विविध मागण्यांसाठी बांधकाम कामगारांचा मोर्चा
विविध मागण्यांसाठी बांधकाम कामगारांचा मोर्चा

जळगाव- विविध मागण्यांसाठी जळगाव जिल्हा बांधकाम कामगार संघटनेतर्फे सोमवारी मुखर्जी उद्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयातपर्यंत मोर्चा काढण्यात आला़ त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी मोर्चामध्ये छगन सपकाळे, नाना ठाकरे, हनीफ शेख, अजिज शेख, समाधान कोळी, शेख मेहमुद शेख शब्बीर, विजय पवार आदींचा सहभाग होता़ सकाळी ११ वाजता मोर्चा श्याम ा प्रसाद मुखर्जी उद्यानापासून मोर्चाला सुरूवात झाली़ यामध्ये बांधकाम कामगारांचा सहभाग होता़ नंतर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चाचा समारोप झाला.

अशा आहेत मागण्या
बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सर्व योजनांचा लाभ कामगारांना द्या, २०१६ पासून प्रलंबित असलेली कल्याणकारी लाभांची प्रकरणे ३१ जानेवारीपर्यंत मार्गी लावून ती कामगारांच्या बँक खात्यात वगर्स करावे, सर्व नोंदीत बांधकाम क्षेत्रातील कामगारांना घरकुल बांधनीसाठी ३ लाख रूपये कर्ज व ३ लाख अनुदान द्यावे यासह विविध मागण्या बांधकाम कामगार संघटनेकडून करण्यात आल्या आहेत.

Web Title:  Construction workers' march for various demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.