शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Pawar पवार कुटुंबात तीन खासदार, दोन आमदार तरी ही घराणेशाही नाही; रोहित पवारांचा तर्क ऐका...
2
राज्य भाजपात मोठे बदल होणार?; दिल्लीत पार पडणार महाराष्ट्रातील बड्या नेत्यांची बैठक
3
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
4
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
5
वायनाड की रायबरेली? निर्णय घेण्यासाठी राहुल गांधींकडे शेवटचा १ दिवस बाकी, अन्यथा...
6
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
7
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
8
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
9
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
10
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
11
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
12
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
13
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
14
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान
15
भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड
16
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
17
'बोलेंगे भी और लडेंगे भी!' JNU सिनेमाचा ज्वलंत ट्रेलर, सिद्धार्थ बोडकेचा जबरदस्त अभिनय
18
Investment Post Office : ₹१०० ची पॉवर : ५ वर्षांत जमा कराल गॅरंटीड लाखोंचा फंड, समजून घ्या गणित
19
राजामौलींच्या सिनेमातून प्रविण तरडेंची दाक्षिणात्य सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री; साकारणार खतरनाक खलनायक
20
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद

निवडणुकांचा परिणाम : आवक घटल्याने हरभरा तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 12:19 PM

शासकीय गोदामात माल शिल्लक असतानाही भाववाढ

जळगाव : बाजारपेठेत हरभऱ्याची मागणी कायम असताना आवक घटल्याने हरभऱ्याचे भाव वाढत असून आठवडाभरात हरभरा ३०० ते ३५० रुपये प्रती क्विंटलने वधारून ४३०० ते ४५०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचला आहे. विशेष म्हणजे शासकीय खरेदी केंद्रावर खरेदी झालेला हरभरा गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणात शिल्लक असताना केवळ लोकसभा निवडणुकीमुळे हा माल बाहेर येत नसल्याने भाववाढ होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी याच दिवसात हरभºयासह डाळीचे भाव गडगडले होते, हे विशेष.रब्बी हंगामातील गहू, हरभºयाची आवक बाजारपेठेत सुरू असून यात गव्हाची आवक मोठ्या प्रमाणात असली तरी हरभºयाचे उत्पादन कमी असल्याने बाजारपेठेत आवकही कमी आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा हरभºयाची आवक केवळ निम्म्यावरच असून त्याचा परिणाम भाववाढीत होत आहे. सध्या हरभºयाला मागणी कायम असून दररोज ७०० ते एक हजार क्विंटल हरभºयाची आवक होऊन तेवढाच माल विक्री होत आहे. यामध्ये दालमिल चालक, सुपरशॉप चालक तसेच होलसेल किराणा दुकानदार यांच्याकडून दररोज हरभºयाची खरेदी होत आहे. ही मागणी कायम असल्याने गेल्या आठवड्यात ३ हजार ८०० ते ४ हजार १५० रुपये प्रती क्विंटलवर असलेल्या हरभºयाच्या भावात ३०० ते ३५० रुपये प्रती क्विंटलने वाढ होऊन तो या आठवड्यात ४ हजार ३०० ते ४ हजार ५०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचला आहे.निवडणुकांचा परिणामशासकीय खरेदी केंद्रावर हरभरा खरेदी केल्यानंतर सरकारने हा माल गोदामात ठेवलेला आहे. मात्र सध्या लोकसभा निवडणुकीमुळे हा माल बाहेर काढला जात नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. परिणामी माल असूनही तो बाजारात येत नसल्याने व मागणीच्या तुलनेत तो उपलब्ध होत नसल्याने हरभºयात तेजी येत असल्याचे सांगण्यात येत आहे.पावसाळ््यापर्यंत अशीच स्थिती राहणारनिम्मा मे महिना होईपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वारे सुरू राहणार असल्याने शासकीय गोदामातील माल बाहेर येणे व नवीन उत्पादनही येणे शक्य नसल्याने बाजारात हरभºयाची पावसाळ््यापर्यंत अशीच स्थिती राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आवक कशी राहणार यावर सर्व गणित अवलंबून असून आणखी भाववाढीची शक्यतादेखील वर्तविली जात आहे.गेल्या वर्षी याच दिवसात गडगडले होते भावगेल्या वर्षी हरभºयाचे उत्पादन वाढण्यासह दोन वर्षांपासूनचा माल शिल्लक असल्याने बाजारपेठेत हरभºयासह डाळीचीही आवक वाढून डाळीच्या भावात ७०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटलने घसरण झाली होती. गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात हरभºयाची मोठ्या प्रमाणात लागवड होऊन उत्पादन साधारण २५ ते ३० टक्क्याने वाढले होते. परिणामी आवक वाढून डाळींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊन हरभरा डाळीचे भाव ४ हजार ७०० ते ५ हजार २०० रुपये प्रती क्विंटलवर आले होते. हेच भाव या वर्षी ५ हजार ७०० ते सहा हजार रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहे.हरभºयाला मागणी कायम असताना आवक कमी झाल्याने हरभºयाच्या भावात वाढ होत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात हरभºयाचे भाव ३०० ते ३५० रुपये प्रती क्विंटलने वाढले आहे.- शशी बियाणी, व्यापारी, कृषी उत्पन्न बाजार समिती, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव