भुसावळात विविध मागण्यांसाठी काँग्रेसचा मोर्चा
By Admin | Updated: June 8, 2017 13:53 IST2017-06-08T13:53:17+5:302017-06-08T13:53:17+5:30
काँग्रेस कमेटीतर्फे पायी मोर्चा काढून प्रांताधिकार श्रीकुमार चिंचकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आल़े

भुसावळात विविध मागण्यांसाठी काँग्रेसचा मोर्चा
ऑनलाईन लोकमत
भुसावळ,दि.8 - भाजपा सरकारने गेल्या तीन वर्षात अनेक आश्वासन देऊनही त्यांची पूर्तता न केल्याने शासनाचा निषेध करीत शहर काँग्रेस कमेटीतर्फे पायी मोर्चा काढून प्रांताधिकार श्रीकुमार चिंचकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आल़े
काँग्रेसचे शहराध्यक्ष रवींद्र निकम, प्रदेश उपाध्यक्ष योगेंद्रसिंग पाटील, जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, शहर उपाध्यक्ष संजय खडसे, सरचिटणीस रहिम कुरेशी, तालुकाध्यक्ष पंकज पाटील, सलीम गवळी, बबन मेढे, ईस्माईल गवळी, अनिता खरारे, कल्पना तायडे, प्रकाश मोरे, रामअवतार परदेशी, अन्वर तडवी, जॉनी गवळी, यास्मीन तडवी, प्रशांत बी़पाटील, दिलीप पाटील, मेहबूब खान, बब्बू माळी, फिरोज खान, कैलास चौधरी, विवेक नरवाडे, विलास खरात यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होत़े