केंद्र सरकारच्या आरक्षण धोरणाविरोधात काँग्रेसचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:12 IST2021-06-27T04:12:45+5:302021-06-27T04:12:45+5:30
जळगाव : ओबीसी आरक्षण रद्द होण्याला मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप करीत याचा निषेध म्हणून शहर काँग्रेसतर्फे आंदेालन ...

केंद्र सरकारच्या आरक्षण धोरणाविरोधात काँग्रेसचे आंदोलन
जळगाव : ओबीसी आरक्षण रद्द होण्याला मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप करीत याचा निषेध म्हणून शहर काँग्रेसतर्फे आंदेालन करण्यात आले. शनिवार २६ जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनी, सामाजिक न्याय दिनी काँग्रेस पक्षाच्यावतीने काँग्रेस भवनासमोर हे आंदोलन झाले.
आरक्षण, संविधान आणि लोकशाही संपविण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देश असून संघाच्या इशाऱ्यावर चालणारे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आरक्षण संपविण्यासाठीच काम करीत असल्याचा आरोप यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला. यावेळी एन.एस.यू आय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, शहर उपाध्यक्ष श्याम तायडे, अनुसूचित जाती अध्यक्ष प्रदीप सोनवणे, ज्ञानेश्वर कोळी, योगेश देशमुख, दीपक सोनवणे, जगदीश गाढे, अमजद पठाण, मनोज सोनवणे, जाकीर बागवान, परवेश पठाण, मनोज चौधरी, राहुल भालेराव,पी.जी.पाटील, विष्णू घोडेस्वार, मीना पाटील, योगिता शुक्ल, प्रमोद घुगे, भिकन सोनवणे, सचिन माळी, गोकुळ चव्हाण आदी उपस्थित होते.