शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "राणे चौथ्यांदा पराभूत होतील आणि बारामतीत सुप्रिया सुळे जिंकणार"; संजय राऊतांचा विश्वास
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
4
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
5
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
6
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
7
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
9
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
10
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
11
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
12
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
13
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
14
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
15
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
16
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
17
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
18
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
19
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
20
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...

पारोळा येथे कापूस खरेदी केंद्रावर टोकन वाटपावरून गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 3:50 PM

गेल्या शुक्रवारपासून कृषी उत्पन्न बाजार समितीकडून कापूस माल विक्रीचे टोकन देणे बंद झाल्याने २४ रोजी मोठा उद्रेक व्यापारी वजा शेतकऱ्यांनी केला.

ठळक मुद्देपोलिसांच्या मध्यस्थीने मिटला वादबाजार समिती आवारात दीड-दोनशे वाहनांचा गराडा

पारोळा, जि.जळगाव : गेल्या शुक्रवारपासून कृषी उत्पन्न बाजार समितीकडून कापूस माल विक्रीचे टोकन देणे बंद झाल्याने २४ रोजी मोठा उद्रेक व्यापारी वजा शेतकऱ्यांनी केला. टोकन वाटपात वशिलाबाजीचा होत असल्याचा आरोप काही शेतकऱ्यांनी या वेळी केला. मोठ्या संख्येने शेतकरी व व्यापारी यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात १५०-२०० कापसाने भरलेल्या वाहनांचा गराडा यावेळी पडला होता. महामार्गाला लागून या कापूस विक्रीच्या रांगा लागलेला होत्या. या वेळी व्यापारी शेतकरी यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी यांच्यात टोकन देण्यावरून चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. पोलिसांच्या मध्यस्थीने या वादावर अखेर पडला. अर्धा तास काही जणांना टोकन वाटप करण्यात आले. त्यानंतर वाढता गोंधळ पाहून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमोल पाटील यांनी टोकन वाटप बंद करण्याचा निर्णय घेतला.दळवेल, ता.पारोळा, ओम नमोशिवाय जिनिंग, बालाजी कोटेक्स या तीन केंद्रांवर पणनच्या माध्यमातून शेतकºयांचा कापूस खरेदी केला जात होता. यात कृषी उत्पन्न बाजार समितीकडून टोकन देणे बंद करण्यात आले होते. यामुळे तिन्ही केंद्रांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रमेश चौधरी यांनी ही सर्व वाहने बाजार समितीच्या आवारात आणा. येथून टोकन घेऊ. मग खरेदी केंद्रावर घेऊन जा, असा फतवा काढला. यामुळे १५० ते २०० वाहने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आली. यामुळे वाहने लावण्यास जागा नव्हती. महामार्गालगतदेखील वाहने उभी होती. मग टोकन देण्यावरून खूप वाद झाले. गोंधळ वाढत असल्याने मग पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर व पोलिसांनी मध्यस्थी करीत या वादावर पडदा पडला. त्यानंतर पुन्हा गोंधळ वाढत होता. यामुळे मग सभापती अमोल पाटील यांनी मग टोकन वाटप थांबविली.या वेळी सभापती अमोल पाटील यांच्याशी चर्चा केली असता ग्रेडरचे व्यापाºयाशी संगतमत होते, व्यापाºयांचा माल ग्रेडर सर्रास कोणतीही कट्टी न लावता मोजत होते. पण एखाद्या शेतकºयाचे वाहन आले की कट्टी लावत होते. वास्तविक ग्रेडर यांना कट्टी लावण्याचा अधिकार नसतानाही ते शेतकºयांच्या मालाला कट्टी लावत आहेत. मग शेतकºयांची लूट होत होती. यात ग्रेडर आणि व्यापारी संगनमताने गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप सभापती अमोल पाटील यांनी केला. व्यापारी शेतकºयांचे सातबारा उतारे घेऊन माल विक्री करीत आहे. हा गोंधळ पाहून टोकन वाटपाला स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती त्यांनी ‘लोकमत’ला दिली.दरम्यान, बाजार समितीचे सचिव रमेश चौधरी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता तो होऊ शकला नाहीशेतकºयांनी वाहनाचे भाडे आणि खुंटी का भरावी?कापूस खरेदी केंद्रावर गेले की कापूस तत्काळ मोजला जात नाही. त्याच वाहनाला २२०० रुपये भाडे आणि ७०० रुपये खुटी लागते. गेल्या शुक्रवारपासून आमची वाहने ही जिनच्या बाहेर उभी आहेत. मग आम्ही भाडे आणि खुटी का भरावी? एका बाजूला ग्रेडर आमच्या मालाला कट्टी लावता. पण व्यापाºयाचा माल तो कसाही असो त्याला पहिली ग्रेड दिली जाते. मग आम्ही काय पाप केले आहे? ते आमच्याबाबतीत असे घडते, अशी संतप्त प्रतिक्रिया शेवगे बुद्रूक येथील शेतकरी धनंजय भिला पाटील यांनी व्यक्त केली.