लिंक रेल्वे गाड्यांच्या क्रमांकातील बदलाने गोंधळ, रेल्वे प्रशासनाकडून गाड्यांची घोषणाही नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 16:03 IST2025-05-05T16:00:18+5:302025-05-05T16:03:22+5:30

Indian Railway Latest News: रेल्वेने कोणत्या स्थानकावर आहे किंवा उशिराने धावत आहे का, याची स्थिती मोबाइल अॅपवर कळते. त्यानुसार प्रवासी रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी नियोजन करतात.

Confusion at Bhusawal railway station due to change in number of Link Railway trains, no announcement of trains by railway administration | लिंक रेल्वे गाड्यांच्या क्रमांकातील बदलाने गोंधळ, रेल्वे प्रशासनाकडून गाड्यांची घोषणाही नाही

लिंक रेल्वे गाड्यांच्या क्रमांकातील बदलाने गोंधळ, रेल्वे प्रशासनाकडून गाड्यांची घोषणाही नाही

वासेफ पटेल, भुसावळ
भुसावळरेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या लिंक गाड्या ह्या एका क्रमांकाने स्थानकावर येतात व नंतर दुसऱ्या क्रमांकाने पुढे मार्गस्थ होतात. यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ होतो. संध्याकाळी तर भुसावळ-सुरत या दोन गाड्या काही मिनिटांच्या अंतराने सुटत असल्यामुळे व या गाड्यांची क्रमांकासह अनाउन्सिंग होत नसल्याने प्रवाशांमध्ये प्लॅटफॉर्म बदलण्यासाठी तारांबळ उडतते.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

रेल्वेने कोणत्या स्थानकावर आहे किंवा उशिराने धावत आहे का, याची स्थिती मोबाइल अॅपवर कळते. त्यानुसार प्रवासी रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी नियोजन करतात. भुसावळ स्थानकावरून काही लिंक गाड्या सुटतात. त्यानुसार प्रवासी हे गाडीच्या सुटण्याआधी स्थानकावर पोहोचतात. मात्र, त्या लिंक गाड्या असल्यामुळे इतर स्थानकावरून वेगळ्या क्रमांकाने भुसावळ स्थानकात येतात व भुसावळ स्थानकात आल्यानंतर त्या गाडीचा नंबर बदलून ती पुढे जाते, यामुळे प्रवाशांचा घोळ होतो.

वाचा >> शेतात अर्धनग्न अवस्थेत आढळला विवाहित महिलेचा मृतदेह, बलात्कारानंतर हत्या केल्याचा संशय

दरम्यान, नंदुरबार येथून आलेली ५९०७५ नंदुरबार-भुसावळ ही लिंक गाडी भुसावळ-सुरत १९००८ क्रमांकाने फलाट क्रमांक आठवरून सुरतसाठी रवाना होते. ही गाडी साधारण वेळेवर सुटत असते. 

फलाट क्रमांक एकवरील गाडी उशिराने येते व फलाट क्रमांक आठची गाडी वेळेवर सुटते. अर्थातच दोघांची वेळ साधारण एकच होऊन जाते. मात्र सुरतकडे जाणारे प्रवासी क्रमांक न पाहता पळत सुटतात व अनेकवेळा या गाडीचे प्रवासी त्या गाडीत व त्या गाडीचे प्रवासी या गाडीत बसतात. असा गोंधळ होणे ही नित्याची बाब झाली आहे.

या आहेत लिंक रेल्वेगाड्या 

क्र. ११११३-११११४ भुसावळ-देवळाली ही गाडी क्रमांक बदलून भुसावळ-वर्धासाठी १११२१-१११२२ अशी होते. गाडी एकच, मात्र लिंक केल्यानंतर एकच गाडीवर चार क्रमांक असतात.

कटनी-भुसावळ/भुसावळ - सुरत क्र. १९०१३-१९०१४ कटनी-भुसावळ ही गाडी कटनीवरून भुसावळला सायंकाळी सात वाजता येते व साडेसात वाजता भुसावळ येथून १९००५/१९००६ या क्रमांकाने भुसावळ-सुरत अशी रूपांतरित होऊन सुरतकडे मार्गस्थ होते. या गाडीची वेळ साडेसात वाजता असते. मात्र, ही गाडी कटनीवरून उशिराने आली. प्रवाशांचा मोठाच गोंधळ होतो.

क्र. १९००७-१९००८ भुसावळ-सुरत आणि ५२०७६-५९०७५ भुसावळ-नंदुरबार १२००३-१९००४ भुसावळ-दादर व ०९०५१/०९०५२ भुसावळ-दादर या सुद्धा लिंक गाड्या आहेत.

भुसावळ स्थानकावरून फलाट क्र. एकवरून कटनी येथून येणारी लिंक गाडी सुरतकडे जाते, तर फलाट क्र. आठवरून नंदुरबार येथून आलेली गाडी पुन्हा सुरतकडे जाते. दोन वेगवेगळ्या फलाटावरून सुरतसाठी गाड्या सुटतात. या गाड्यांची लिंक नंबरसह अनाउन्सिंग करावी, अशा सूचना त्वरित देण्यात येतील, जेणेकरून प्रवाशांमध्ये गोंधळ होणार नाही. -इती पांडे, डीआरएम भुसावळ

Web Title: Confusion at Bhusawal railway station due to change in number of Link Railway trains, no announcement of trains by railway administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.