रावेरमध्ये नळ पाणीपुरवठा योजनेचे गाऱ्हाणे कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 11:49 AM2020-05-28T11:49:07+5:302020-05-28T11:56:35+5:30

रावेरला नळ पाणीपुरवठा योजनेचे गाऱ्हाणे आजही कायम आहे.

Complaints of tap water supply scheme continue in Raver | रावेरमध्ये नळ पाणीपुरवठा योजनेचे गाऱ्हाणे कायम

रावेरमध्ये नळ पाणीपुरवठा योजनेचे गाऱ्हाणे कायम

googlenewsNext
ठळक मुद्देनागरिकांचे हाल थांबेनादोन नवीन पर्यायी ७५ अश्वशक्तीचे मोटार पंप व बिघाड झालेल्या ७५ अश्वशक्तीच्या मोटार पंपाना 'कोरोना'चं रोनं



हाल : दोन नवीन पर्यायी ७५ अश्वशक्तीचे मोटारपंप व बिघाड झालेल्या ७५ अश्वशक्तीच्या मोटारपंपांना 'कोरोना'चं रोनं


रावेर : शहरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या ऐनपूर शिवारात तापीनदी काठी असलेल्या जॅकवेलच्या दोन्ही ७५ अश्वशक्तीच्या मोटारपंपात सदोष तांत्रिक बिघाड होणे हे आता दरवर्षी नित्त्याचे झाले आहे. असे असतानाही, नवीन दोन ७५ अश्वशक्तीच्या मोटारपंपांची पर्यायी व्यवस्था पालिकेकडून होऊ शकली नाही. गतवर्षी केलेल्या दोन नवीन ट्युबवेलवरून थेट जलशुद्धीकरण प्रकल्पाला संयोजन जोडून कायमस्वरूपी तातडीची उपाययोजना पालिकेकडून केली जाणार आहे. यामुळे गुरुवारपासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरळीत झाल्याची माहिती मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी दिली.

        रावेर शहराला दररोज २५ लाख लीटर्सचा नळपाणीपुरवठा करणार्‍या ऐनपूर जॅकवेलच्या दोन्ही ७५ अश्वशक्तीची क्षमता असलेल्या मोटारपंपांत तीन-चार दिवसांपासून पंपात तांत्रिक बिघाड झाल्याने शहराचा नळपाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. त्यात स्टेशनरोडवरील नागरी वसाहती जास्त प्रभावीत झाल्या आहेत. ही समस्या गतवर्षी दुष्काळाच्या भीषण दाहकतेत निर्माण झाली होती. यंदा मात्र तापी नदीपात्रात मुबलक पाणी असतानाही बिघाड झाला. दरवर्षी जॅकवेलच्या मोटारपंपात तांत्रिक बिघाड निर्माण होतो. शहराला दररोजच्या २५ लाख लीटर पाण्याची गरज पाहता दोन नवीन ७५ अश्वशक्तीचे मोटारपंप खरेदी करून पर्यायी व्यवस्था करणे नितांत गरजेचे आहे.
त्या घटनेला पूर्ण वर्ष लोटले तरी संबंधित कंपनीकडे मागणी नोंदवलेले मोटारपंप न.पा.कडे दाखल होऊ शकले नाही. त्याचे कारण म्हणजे सबमर्सिबल पंप निर्माण करणार्‍या कंपन्यांकडील यांत्रिक कामगार निघून गेल्याचे सांगण्यात येते. वर्षभरापूर्वी मागणी नोंदवली असती तर कंपनी दोन ७५ अश्वशक्तीच्या मोटारपंपांची निर्मिती करू शकली असती.
दरम्यान, नगरसेवक सुधीर पाटील व नगरसेवक रंजना गजरे यांनी न्यायालयाच्या आवारा शेजारील नवीन दोन ट्युबवेलचे संयोजन थेट जलशुद्धीकरण केंद्रात जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीशी जोडून कायमची पर्यायी व्यवस्था करण्याबाबत रेटा लावला होता. त्या अनुषंगाने दोन्ही ट्युबवेलचे संयोजन मुख्य जलवाहिनीला जोडण्याची धडक मोहीम सुरू आहे. गुरुवारपासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरळीत झाल्याचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी सांगितले. 

Web Title: Complaints of tap water supply scheme continue in Raver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.