गौण खनिज अपहारात अखेर पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:52 IST2021-02-05T05:52:19+5:302021-02-05T05:52:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा परिषदेच्या मालकीच्या पाझर तलावातील गौण खनिज रॉयल्टी, वाहतुकीचे परवाने या कोट्यधींचा भ्रष्ट्राचार प्रकरणात ...

गौण खनिज अपहारात अखेर पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा परिषदेच्या मालकीच्या पाझर तलावातील गौण खनिज रॉयल्टी, वाहतुकीचे परवाने या कोट्यधींचा भ्रष्ट्राचार प्रकरणात जि. प. सदस्या पल्लवी सावकारे यांनी गुरूवारी अखेर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांची भेट घेऊन लघूसिंचन विभागाचे अधिकारी व ठेकेदारांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली. पोलीस अधीक्षकांनी त्यांचे म्हणणे सविस्तर ऐकून घेत जिल्हाधिकाऱ्यांचा अभिप्रया घेऊन पुढील कार्यवाही करणार असल्याचे त्यांना सांगितले.
जि.प.सीईओ संबधित अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. १७ वेळा पत्र देऊनही माहिती उपलब्ध होत नाही, जिल्हाधिकारी यांच्या आदेशानानंतरही कारवाई होत नाही, म्हणून आता गुन्हा दाखल करण्याच्या मागणी आपण पोलीस अधीक्षकांची भेट घेतली असून आर्थिक गुन्हे शाखेने याचा तपास करावा अन्यथा उच्च न्यायालात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे सावकारे यांनी म्हटले आहे.