खडकदेवळा येथील शेतकऱ्यास नुकसान भरपाई केवळ २७० रुपये...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:18 IST2021-07-27T04:18:27+5:302021-07-27T04:18:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खडकदेवळा, ता. पाचोरा : पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील शेतकरी अरुण विश्राम देवरे यांच्या शेतातील मका पिकाचे ...

खडकदेवळा येथील शेतकऱ्यास नुकसान भरपाई केवळ २७० रुपये...
लोकमत न्यूज नेटवर्क
खडकदेवळा, ता. पाचोरा : पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील शेतकरी अरुण विश्राम देवरे यांच्या शेतातील मका पिकाचे मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसाने नुकसान झाले होते. मात्र या नुकसानीची भरपाई मिळाली चक्क दोनशे सत्तर रुपये.
सन २०१९ ते २०२०मध्ये अवकाळी पावसात देवरे यांचे सुमारे दीड एकरवरील मका पिकाचे नुकसान झाले होते. त्यात त्यांचे सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज होता. त्यांनतर पीक नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. मात्र पंचनामा करून त्या नुकसान भरपाईचे नुकतेच वाटप करण्यात आले. त्यात त्यांना फक्त बँक खात्यात रक्कम मिळाली ती फक्त दोनशे सत्तर रुपये.
या अवकाळी नुकसान भरपाई मिळण्यासाठी कागदपत्रे तयार शेतकऱ्यांना तब्बल ५०० रुपये खर्च केल्याचे यावेळी देवरे यांनी सांगितले. अवकाळी नुकसान भरपाई ही कोणत्या आधारावर देण्यात आली आहे. याचीही चौकशी करून मला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे. याप्रकरणी पाचोरा तहसीलदारांना तक्रार अर्ज देण्यात आला आहे.