विचखेडा येथे पशुधनाच्या जीवितहानीमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:20 IST2021-09-12T04:20:52+5:302021-09-12T04:20:52+5:30
दिनांक १० सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाने या खड्ड्यांमध्ये तुडुंब पाणी भरून रस्त्यावर वाहू लागले. १० सप्टेंबर रोजी विचखेडा ...

विचखेडा येथे पशुधनाच्या जीवितहानीमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या....
दिनांक १० सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाने या खड्ड्यांमध्ये तुडुंब पाणी भरून रस्त्यावर वाहू लागले. १० सप्टेंबर रोजी विचखेडा येथील शेतकरी बाबुलाल रामा माळी हे आपल्या दैनंदिन नियोजनानुसार कुटुंबासह बैलगाडीवर आपल्या शेतात निघाले. या खड्ड्यांच्या ठिकाणी बैलांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने बैलगाडी, दोन्ही बैल, माळी आपल्या कुटुंबासह खड्ड्यात बुडाले. याठिकाणी सभोवताली असलेल्या नागरिकांना हा प्रकार कळताच त्यांनी प्रसंगावधान दाखवत माळी व त्यांच्या कुटुंबीयांना कसेबसे करून बाहेर काढले. मात्र, दोन्हीही बैलांना बाहेर काढण्यात अपयश आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
यावेळी बाबुलाल माळी यांच्यासह कुटुंब व या ठिकाणी उपस्थित सरपंच रवींद्र पानपाटील, सदस्य अमोल पाटील, भरत माळी, नाना माळी, बापू गढरी, वैभव पाटील, हितेंद्र देवरे, गोपाल माळी, हितेश पाटील, शाहरूख शेख, रोहित पाटील, रंजित पाटील व इतर नागरिकांनी आमदार चिमणराव पाटील यांची भेट घेऊन झालेला प्रकार सांगितला. याची त्वरित दखल घेऊन आमदार चिमणराव पाटील यांनी तहसीलदार, नही प्रा. लि.चे व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधून झालेला प्रकार लक्षात आणून दिला व याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करून माळी यांना तत्काळ झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी, असे आदेश दिले.
110921\11jal_6_11092021_12.jpg
विचखेडे, ता. पारोळा पुलाजवळ झालेल्या अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या मदतीला धावून आलेले ग्रामस्थ.