कोरोनातून दिलासा : सोळा दिवसांत एकही मृत्यू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:16 IST2021-08-01T04:16:14+5:302021-08-01T04:16:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना विषाणूने मार्च व एप्रिल महिन्यांत जिल्हाभरात कहर माजविला होता. मात्र, आता ही दुसरी ...

Comfort from Corona: No death in sixteen days | कोरोनातून दिलासा : सोळा दिवसांत एकही मृत्यू नाही

कोरोनातून दिलासा : सोळा दिवसांत एकही मृत्यू नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना विषाणूने मार्च व एप्रिल महिन्यांत जिल्हाभरात कहर माजविला होता. मात्र, आता ही दुसरी लाट ओसरली असून जिल्ह्यात गेल्या १६ दिवसांपासून एकही मृत्यू नसल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या ११ दिवसांपासून जिल्हाभरातील रुग्णसंख्याही दहाच्या खालीच नोंदविली गेली आहे. शनिवारी जिल्ह्यात ४ नवे बाधित आढळून आले आहेत.

जिल्ह्यात शनिवारी १६६६ आरटीपीआर चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले त्यात १ बाधित आढळून आला आहे. तर ॲंटिजनच्या १२१७ चाचण्यांमध्ये ३ बाधित रुग्ण समोर आले आहेत. यात जळगाव शहरात २ तर चाळीसगावात २ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील १० रुग्ण बरे देखील झाले आहेत.

आता धरणगाव शून्यावर

बोदवड, रावेर, एरंडोल यांच्यापाठोपाठ आता धरणगावातही सक्रिय रुग्ण शून्यावर आले आहेत. या ठिकाणी एकाही रुग्णावर उपचार सुरू नाहीत. शनिवारी एक रुग्ण बरा झाल्यानंतर ही स्थिती निर्माण झाली. दरम्यान, बोदवडमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

रिकव्हरी चार पट

दुसऱ्या लाटेत आतापर्यंत जुलै महिना सर्वाधिक दिलासादायक गेला आहे. या महिन्यात २९२ बाधित रुग्ण आढळून आले असून त्यामानाने चारपटीने अधिक ८७४ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या काळात प्रथमच जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्याही ७७ वर नोंदविली गेली आहे. यात जळगाव शहर प्रथमच दहाच्या खाली गेले आहे.

२० नंतर १० मायनस

जिल्ह्यातील रुग्णसंख्येचा आलेख २० जुलैनंतर अधिकच तळाला गेला आहे. २० जुलैपासून रुग्णसंख्याही १० च्या खालीच स्थिर आहे. गेल्या अकरा दिवसांत ही संख्या १० च्या वर नोंदविली गेलेली नाही.

२१ जुलै ६

२२ जुलै ६

२३ जुलै ६

२४ जुलै ३

२५ जुलै ४

२६ जुलै ४

२७ जुलै ९

२८ जुलै ७

२९ जुलै ९

३० जुलै ९

३१ जुलै ४

जुलै महिन्यातील मृत्यू

१ जुलै : ०१

३ जुलै : ०१

४ जुलै : ०१

९ जुलै : ०१

१५ जुलै : ०१

Web Title: Comfort from Corona: No death in sixteen days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.