मुक्ताईनगरला सफाई कर्मचा:यांचे कामबंद

By Admin | Updated: June 17, 2017 11:59 IST2017-06-17T11:59:20+5:302017-06-17T11:59:20+5:30

रखडलेल्या तीन महिन्यांचा पगार व भविष्य निर्वाह निधी अदा करावे

Cleaning staff of Muktinagar: Workshop | मुक्ताईनगरला सफाई कर्मचा:यांचे कामबंद

मुक्ताईनगरला सफाई कर्मचा:यांचे कामबंद

ऑनलाईन लोकमत


मुक्ताईनगर, जि. जळगाव, दि. 17 -   मुक्ताईनगरच्या सफाई कामगारांनी एक दिवसांचे काम बंद आंदोलन करीत रखडलेल्या तीन महिन्यांचा पगार व भविष्य निर्वाह निधी अदा करावे, अशी मागणी केली आह़े याबाबत ग्रामविकास अधिकारी,  गटविकास अधिकारी व  तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
निवेदनावर गोपाल लोहरे, जितेंद्र ढिके, राजा मंगेश हंसकर, कालीचरण तेजी यांच्यासह एकूण 30 कर्मचा:यांच्या स्वाक्ष:या आहेत. तसेच शिवसेना व युवासेना शहर शाखेतर्फे  सुद्धा सफाई कर्मचा:यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यात आला़ याबाबतचे निवेदन ग्रा.पं.ला देण्यात आल़े  यावेळी सुनील पाटील, प्रशांत टोंगे, राजेंद्र कापसे, संतोष माळी, अमरदीप पाटील, बबलु वंजारी, राजेंद्र हिवराळे आदींसह शिवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Cleaning staff of Muktinagar: Workshop