भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे समर्थनार्थ नागरिक मंच
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 06:45 IST2020-05-18T04:23:27+5:302020-05-18T06:45:14+5:30
जळगाव : विधानसभा तसेच विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी नाकारून भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर सातत्याने अन्याय ...

भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे समर्थनार्थ नागरिक मंच
जळगाव : विधानसभा तसेच विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी नाकारून भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर सातत्याने अन्याय होत असल्याची भूमिका मांडत उत्तर महाराष्ट्र नागरिक मंचच्या माध्यमातून खडसे यांच्या समर्थनार्थ मोहीम उघडण्यात आली आहे.
या मोहिमेद्वारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंना लक्ष्य केले जात आहे. खडसे यांच्या नेतृत्व गुणांचे कौतुक करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांच्या जुन्या चित्रफिती, दिवंगत प्रमोद महाजन यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्यांसोबतचे छायाचित्र या मोहिमेद्वारे समाज माध्यमांवर प्रसारीत केले जात आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार या तीनही जिल्ह्यांमध्ये ही मोहीम व्यापक स्वरूपात राबविली जाणार
असल्याची माहिती मंचच्यावतीने देण्यात आली.