चौबारी, एरंडोलला चोरट्यांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:17 IST2021-09-13T04:17:20+5:302021-09-13T04:17:20+5:30
लंपास अमळनेर : तालुक्यातील चौबारी येथे अज्ञात चोरट्यांनी पाच घरे फोडल्याची घटना ११ रोजी रात्री घडली. एकाच घरातून तीन ...

चौबारी, एरंडोलला चोरट्यांचा धुमाकूळ
लंपास
अमळनेर : तालुक्यातील चौबारी येथे अज्ञात चोरट्यांनी पाच घरे फोडल्याची घटना ११ रोजी रात्री घडली. एकाच घरातून तीन लाख रुपये रोख व पाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. हिंमत धुडकू पाटील (वय ९०)आणि कल्पना राजीव देसले (वय ५०) हे त्यांच्या घरी पुढील भागात रात्री झोपले होते. मागील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. १ लाख रुपये रोख व २ लाखांचे ५ तोळे सोने असा ३ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. तसेच गावातील सोमा सखाराम कढरे, रवींद्र चिंधू पाटील, सुधाकर बाजीराव पाटील यांच्या घराचाही कडीकोयंडा तोडत चोरीचा प्रयत्न केला. पैकी सोमा कढरे यांच्या घरातून दोन पोती पितळी भांडी चोरट्यांनी लंपास केली. शांताराम डिगा पाटील यांच्या घरातून लग्नाच्या मंडपातील वायरचे बंडल चोरीस गेले.
चोरट्यांनी चौबारी रस्त्यावर एका गोदामाजवळ दारू घेतल्याचे समजते. तेथून पकड,स्क्रू ड्रायव्हर चोरले त्यानंतर ते गावात आले असावेत आणि मग घरफोड्या केल्या असाव्यात . त्यांनी आणखी दोन,तीन घरे फोडण्याचा प्रयत्न केला पण बंद घरात काहीच मिळाले नाही. एका महिलेचे पैसे व दागिने डब्यात सुरक्षित राहिले. तर एका महिलेच्या घरातील काजू, बदाम, शेव मुरमुरे याच्यावर ताव मारला.
घटनेचे वृत्त कळताच डीवायएसपी राकेश जाधव, एपीआय जयेश खलाणे, पोलीस उपनिरीक्षक वैभव पेठकर, हेकॉ भास्कर चव्हाण, हेकॉ सचिन निकम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला. त्यांनी श्वानपथक, अंगुली मुद्राच्या पथकाला पाचारण केले. प्रशांत कंखरे व जितेंद्र चौधरी यांनी चोरट्यांचा मार्ग काढण्याचा व ठसे शोधण्याचा प्रयत्न केला; मात्र पाऊस पडल्याने श्वान नाल्याच्या पुढे जाऊ शकले नाही.
कल्पना देसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारवड पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव पेठकर करीत आहेत.