शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

फॅशनेबल नंबर प्लेट व पैशांच्या उधळपट्टीने फोडले जळगाव जिल्ह्यात चोरट्यांचे बींग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 4:08 PM

वारंवार दुचाकी बदल करणे, दुचाकीवर फॅशनेबल नंबर टाकणे तसेच पैशाची अमाप उधळपट्टी या कारणामुळे दुचाकी चोरट्यांचे बींग फुटले आहे. महिनाभराच्या निरीक्षणानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोळंबा (ता.चोपडा)  येथील तिघांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून चोरीच्या तब्बल ९ दुचाकी हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

ठळक मुद्दे कोळंबा येथील तीन दुचाकी चोरटे जाळ्यात   चोरीच्या ९ दुचाकी केल्या हस्तगत पुणे व जळगावातून चोरल्या दुचाकी

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१२ : वारंवार दुचाकी बदल करणे, दुचाकीवर फॅशनेबल नंबर टाकणे तसेच पैशाची अमाप उधळपट्टी या कारणामुळे दुचाकी चोरट्यांचे बींग फुटले आहे. महिनाभराच्या निरीक्षणानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोळंबा (ता.चोपडा)  येथील तिघांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून चोरीच्या तब्बल ९ दुचाकी हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

दररोज पार्टी, महागडे कपडे, दारु अन् मौजमस्ती१.चोपडा तालुक्यातील कोळंबा येथील शरद दिलीप दिलीप कोळी (वय २४), रवींद्र नथ्थू कोळी (२७) व अजय नंदलाल कोळी (वय २२)अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. हे तिघं जण सतत नवनवीन दुचाकी बदल करतात व त्यावर आकर्षक तसेच फॅशनेबल क्रमांक टाकून चोपडा तालुक्यात वावरतात. २.दररोज पार्टी, महागडे कपडे, दारु व मौजमस्ती यावर पैशाची अमाप उधळपट्टी होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे सूरज पाटील या कर्मचाºयाला तिन्ही तरुणांची कुंडली काढण्याच्या सूचना करुन महिनाभर त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. ३.एकाच दुचाकीवर दररोज वेगवेगळे क्रमांक टाकले जात असल्याची खात्री झाल्यानंतर सूरज पाटील, सुशील पाटील, मनोज दुसाने, योगेश वराडे, रवी चौधरी, गफूर तडवी, इद्रीस पठाण, रामचंद्र बोरसे व बापू पाटील यांनी बुधवारी रात्री कोळंबा गावात सापळा लावून तिघांच्या मुसक्या आवळल्या.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा