चोपडा तालुक्यात ट्रकची चिंचेच्या झाडाला जोरदार धडक , क्लिनर ठार, चालक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 13:34 IST2017-11-25T13:31:31+5:302017-11-25T13:34:31+5:30
वर्डी फाटय़ानजीकची घटना

चोपडा तालुक्यात ट्रकची चिंचेच्या झाडाला जोरदार धडक , क्लिनर ठार, चालक गंभीर
ऑनलाईन लोकमत
वर्डी, जि. जळगाव, दि. 25 - भरधाव वेगाने जाणारा ट्रक चिंचेच्या झाडावर धडकून झालेल्या अपघातात एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात चोपडा तालुक्यातील वर्डी फाटय़ानजीक शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास झाला.
राजकोट (गुजरात) येथून नागपूरकडे ट्रॅक्टरचे सुटे भाग घेऊन जाणारा ट्रक वर्डी फाटय़ानजीक चिंचेच्या झाडावर धडकला. यामध्ये क्लिनर विपूल भानजीभाई नागस (रा. राजकोट) हे जागीच ठार झाले तर चालक प्रवीण नारायण बाबडिया (रा. नवागाव, राजकोट) हे गंभीर जखमी झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
अपघातानंतर ट्रकच्या कॅबिनचा पूर्णपणे चुराडा झाला असून जेसीबीच्या सहाय्याने कॅबीन तोडून जखमी व मयतांना बाहेर काढण्यात आले.