शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

यावलमध्ये ट्रॅक्टर अंगावर गेल्याने बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 8:59 PM

यावल शहरातील नवीन वस्ती असलेल्या हरिओम नगरच्या शेजारी उभे केलेले ट्रॅक्टर अचानक मागे सरकल्याने खेळत असलेल्या नऊ वर्षीय बालकाच्या अंगावरून गेल्याने बालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देवस्तीत बालके खेळत असताना घडली घटनाउभे असलेले ट्रॅक्टर अचानक मागे सरकल्याने घडली घटना

यावल, जि.जळगाव : शहरातील नवीन वस्ती असलेल्या हरिओम नगरच्या शेजारी उभे केलेले ट्रॅक्टर अचानक मागे सरकल्याने खेळत असलेल्या नऊ वर्षीय बालकाच्या अंगावरून गेल्याने बालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली.शहरातील हरिओम नगरच्या शेजारी आदिवासी पावरा समाजाची छोटीशी वस्ती आहे. या ठिकाणी काही कुटुंबियांचा रहिवास आहे. माजी नगरसेवक देवराम राणे यांच्या शेताजवळ मंगळवारी सायंकाळी एक ट्रॅक्टर लावलेले होते. त्या ट्रॅक्टरच्या आजूबाजूला बालके खेळत होती.दरम्यान, साडेचार वाजेच्या सुमारास लावलेले ट्रॅक्टर अचानक मागे सरकले. तेव्हा या ट्रॅक्टरजवळ खेळत असलेल्या बालकांपैकी शिवलाल बुधा बारेला (वय नऊ वर्षे) याच्या अंगावर ट्रॅक्टर गेले. ते बालकाच्या डोक्यावरून गेल्याने तो जागीच ठार झाला. त्यास येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ आणले. मात्र तत्पूर्वी त्याचे निधन झाले. घटना समजल्यावर त्यांच्या नातलगांनी त्यास तत्काळ ग्रामीण रुग्णालयात आणले. परंतु त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याबाबत रात्री उशिरा पोलीस ठाण्यात नोंद झालेली नव्हती. 

टॅग्स :AccidentअपघातYawalयावल