कुऱ्हे पानाचे येथील मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 22:55 IST2020-11-17T19:27:33+5:302020-11-17T22:55:27+5:30

कुऱ्हे पानाचे येथील मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

A child from Kurhe Panache drowned | कुऱ्हे पानाचे येथील मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

कुऱ्हे पानाचे येथील मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू


भुसावळ : तालुक्यातील कुऱ्हे (पानाचे) येथील कृष्णदीप दीपक पाटील (१३) हा पाचोरा तालुक्यातील वाणेगाव येथे दिवाळीसाठी मामाच्या घरी गेला असता ऐन भाऊबीजच्या दिवशी १६ रोजी त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे कुऱ्हे ( पानाचे ) व वानेगावसह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कृष्णदीप हा दीपक लहानु पाटील या सैनिकाचा मुलगा होता . भाऊबीज साठी आईसोबत सोबत तो १६ रोजी वानेगाव येथे गेला. मात्र मित्रांसोबत शेतात गेल्यानंतर त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र तरीही त्याचा मृत्यू झाला. दीपक पाटील हे जम्मू काश्मीर येथे सैन्यात कार्यरत आहे. त्यांची सुट्टी दोन दिवसानंतर संपणार होती. त्यामुळे ते १७ रोजी जम्मू-काश्मीर येथे जाणार होते .

कृष्णदीप हा भुसावळ येथील गोदावरी स्कूल मध्ये इयत्ता सातवी मध्ये शिकत होता. वडील सैन्यात आहे . तर आजोबा लहानु पाटील हे सेवानिवृत्त शिक्षक आहे.

Web Title: A child from Kurhe Panache drowned