जळगावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुष्पवृष्टी करीत कंपनी कामगारांनी केले स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 13:42 IST2018-10-08T11:43:47+5:302018-10-08T13:42:14+5:30
आढावा बैठकीसाठी जात असताना रेमण्ड चौकात त्यांचे वाहन थांबवून जोरदार स्वागत

जळगावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुष्पवृष्टी करीत कंपनी कामगारांनी केले स्वागत
जळगाव : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोमवारी सकाळी जळगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर विमानतळावरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असताना रेमण्ड कंपनीच्या कामगारांनी पुष्पवृष्टी करीत मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांचे सकाळी विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनाकडे आढावा बैठकीसाठी जात असताना रेमण्ड चौकात त्यांचे वाहन थांबवून जोरदार स्वागत करण्यात आले. माजी महापौर तथा खान्देश कामगार उत्कर्ष संघटनेचे ललित कोल्हे यांच्यासह पदाधिका-यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या दौऱ्यात त्यांच्या सोबत राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन हेदेखील आहेत.