मराठी नववर्षाला स्मशानात चितांची होळी पेटत होती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 10:51 PM2021-04-13T22:51:31+5:302021-04-13T22:55:59+5:30

मराठी नववर्षाच्या स्वागताला सर्वत्र गुढी उभारली जात असताना मात्र स्मशानात कोरोनामुळे चितांची होळी पेटत होती.

Cheetahs were lighting Holi in the cemetery on Marathi New Year ... | मराठी नववर्षाला स्मशानात चितांची होळी पेटत होती...

मराठी नववर्षाला स्मशानात चितांची होळी पेटत होती...

Next
ठळक मुद्देअकरा जणांचा मृत्यू : ‘अमर’च्या अथक प्रयत्नानंतरही विजयचा मृत्यू..

संजय पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : मुलगा अमर आयसीयु बेडसाठी दोन दिवसांपासून वणवण भटकत होता ....मात्र कुठेच उच्च दर्जाची सुविधा मिळाली नाही .... बाप विजय बोरसे याचा मात्र कोरोनाने पराजय केला आणि मृत्यूने त्याचा आवंढा गिळला होता. मराठी नववर्षाच्या स्वागताला सर्वत्र गुढी उभारली जात असताना मात्र स्मशानात कोरोनामुळे चितांची होळी पेटत होती ,असे विदारक दृश्य दिसत होते. तब्बल ११ जणांचा मृत्यू झाला .

तालुक्यात रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झालेले नाही रुग्णांची परिस्थिती गंभीर होत चालली असून काही रुग्ण निव्वळ उच्च दर्जाच्या सुविधा नसल्याने दगावत आहेत तर काही भीतीने, धसक्याने दगावत आहेत. कुऱ्हे येथील विजय प्रताप बोरसे या सेवानिवृत्त शिक्षकाची आई २५ रोजी मयत झाली होती. त्यांनतर ते स्वतः आणि त्यांचे भाऊ दोघेही कोरोनाच्या उपचारसाठी वेगवेगळ्या दवाखान्यात दाखल झाले. ग्रामीण रुग्णालयात विजय बोरसे यांची नियमित काळजी घेतली जात होती. मात्र रुग्णाची परिस्थिती गंभीर होत आहे म्हणून त्यांना उच्च दर्जाची सुविधा असलेल्या आयसीयु बेडची आवश्यकता आहे, असे डॉक्टरांनी सांगितलेही मात्र बोरसे यांचा मुलगा अमर आयसीयु बेडसाठी वणवण भटकत होता; परंतु बेड मिळाला नाही, इकडे वडील अत्यवस्थ होत होते. पण बघण्यापलिकडे त्याच्याकडे पर्याय नव्हता. विजय बोरसेची शुद्ध हरपली आणि अखेर अमरच्या प्रयत्नांनतरही १२ रोजी रात्री साडेअकरा वाजता मृत्यूशी झुंज देताना त्यांचा पराजय झाला.

भडकल्या होत्या चिता, डोळ्यासमोर होती चिंता..

यासोबत आल्हाद नगर पिंपळे रोड, देशमुख गल्ली, अकुलखेडा, सराफ बाजार जैन मंदिर, तांबेपुरा, मुडी प्र. डांगरी, मुंदडा नगर, कळमसरे, लक्ष्मी नगर ढेकू रोड,मांडळ येथील ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मराठी नववर्षाच्या स्वागताला सर्वत्र गुढी उभारल्या जात असताना तिकडे स्मशानात चिता जळत होत्या, असे विदारक दृश्य होते.

Web Title: Cheetahs were lighting Holi in the cemetery on Marathi New Year ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.