खंडणी मागणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल, एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:21 IST2021-09-12T04:21:51+5:302021-09-12T04:21:51+5:30
तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथील बंटी पथरोड याच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील साकेगाव येथे शुभेच्छा फलक लावण्यात आले होते. या ...

खंडणी मागणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल, एकास अटक
तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथील बंटी पथरोड याच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील साकेगाव येथे शुभेच्छा फलक लावण्यात आले होते. या फलकाची तोडफोड केल्याच्या कारणावरुन आरोपींनी फिर्यादी मयूर काळे ( १९, रा. साकेगाव) याचे अपहरण केले व त्याच्या परिवाराकडून पाच लाखांची खंडणी मागितली. यानंतर दोन लाखांवर व्यवहार निश्चित झाला व उर्वरित रक्कम दहा हजार रुपये हप्त्याने देण्याचे ठरले.
यानंतर मयूर याच्या वडिलांनी आरोपींकडे दोन लाख रुपये दिले व मयूर याची सुटका करुन घेतली. याबाबत तालुका पोलिसात मयूर काळे याच्या फिर्यादीवरुन आरोपी नितीन कोळी, हर्षल पाटील, सागर भोई, बंटी पथरोड ( रा. भुसावळ) या आरोपींविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एपीआय अमोल पवार करीत आहेत. या गुन्ह्यात आरोपी सागर भोई यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.