गणेश विसर्जनानिमित्त शहरातील वाहतूक मार्गाल बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:19 IST2021-09-18T04:19:00+5:302021-09-18T04:19:00+5:30
जळगाव : अत्यंत भक्तिभावाने प्रत्येकाच्या घरात आणि मनामनात विराजमान झालेल्या बाप्पाचे विसर्जन रविवार, १९ रोजी होणार आहे. त्यामुळे बाप्पाच्या ...

गणेश विसर्जनानिमित्त शहरातील वाहतूक मार्गाल बदल
जळगाव : अत्यंत भक्तिभावाने प्रत्येकाच्या घरात आणि मनामनात विराजमान झालेल्या बाप्पाचे विसर्जन रविवार, १९ रोजी होणार आहे. त्यामुळे बाप्पाच्या विसर्जनासाठी भक्तांचा जनसागर मेहरूण तलावाजवळ उसळणार असून ईच्छादेवी ते मलंगशहा बाबा दर्गा (शिरसोली रोड) दरम्यान वाहनांची वर्दळ असेल. त्या दृष्टीने शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहे.
अनंत चतुर्दशीला बाप्पाच्या विसर्जनासाठी मेहरूण तलाव येथे भक्तांचा जनसागर उसळतो़ त्यामुळे रस्ते वाहतुकीवरही मोठ्या परिणाम होत असतो. त्या अनुषंगाने विसर्जनाच्या दिवशी शहरातील वाहतूकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे तर काही मार्ग बंद ठेवण्यात आले आहे. त्यानुसार जळगाव ते पाचोरा येणा-या व जाणा-या दुचाकी, कार व इतर हलक्या वाहनांसाठी ईच्छादेवी चौकी ते शिरसोली रस्ता हा बंद असणार आहे. त्यामुळे या वाहनांना पाचोराकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक, डी मार्ट, मलंगशहा बाबा दर्गा या रस्त्याचा वापर करतील. तर जळगावकडे येणा-या वाहनांसाठी मलंगशहा बाबा दर्गा, राजे संभाजी चौक, संत गाडगेबाबा चौक, महाबळ चौक, काव्यरत्नावली चौक, आकाशवाणी चौक मार्गे जळगाव असा पर्यायी मार्गाचा वापर करतील, असे शहर वाहतूक शाखेच्यावतीने कळविण्यात आले आहे.
आसोदा, भादलीसाठी राहणार पर्याची मार्ग
आसोदा, भादलीकडून जळगावकडे येणा-या व जाणा-या एस. टी. बसेस व इतर सर्व वाहने सकाळी ६ ते मध्यरात्रीपर्यंत मोहन टॉकीज, गजानन मालुसरेनगर, जुने जळगाव, लक्ष्मीनगर, कालंका माता मंदिरमार्गे महामार्गावरून अजिंठा चौक, आकाशवाणी चौक, नवीन बस स्टॅण्ड या मार्गाचा वापर करतील. तसेच ईच्छादेवी चौकी, डीमार्ट, मोहाडी रोड, गायत्री नगर, गणेश घाट, सेंट टेरेसा स्कूल, हॉटेल ग्रॅपिज, मलंगशहा बाबा दर्गा, शिरसोली रोडवरील वाहतूक जळगावकडे येणा-या व जाणा-या एसटी बसेस व इतर सर्व प्रकारचे अवजड वाहनांसाठी सुरू राहिल.