आव्हाणे ग्रा.पं.च्या चार जागा बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:45 AM2021-01-08T04:45:34+5:302021-01-08T04:45:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - तालुक्यातील आव्हाणे ग्राम पंचायतीच्या चार जागा बिनविरोध झाल्या आहेत. ग्रा.पं.च्या १३ जागांसाठी ५६ ...

Challenges Four seats of G.P. | आव्हाणे ग्रा.पं.च्या चार जागा बिनविरोध

आव्हाणे ग्रा.पं.च्या चार जागा बिनविरोध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - तालुक्यातील आव्हाणे ग्राम पंचायतीच्या चार जागा बिनविरोध झाल्या आहेत. ग्रा.पं.च्या १३ जागांसाठी ५६ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी ४ अर्ज छाननी अंती बाद ठरले होते. उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा दिवशी एकूण २५ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे प्रभाग क्रमांक १ मधील राकेश नरेंद्र चौधरी हे बिनविरोध झाले आहेत. तर प्रभाग क्रमांक ४ मधील तीन्ही जागा बिनविरोध झाल्या आहेत. दरम्यान, आता ९ जागांसाठी सरळ दोन पॅनलमध्ये लढत रंगणार आहे. ९ जागांसाठी १८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. पंचायत समिती सदस्य ॲड.हर्षल चौधरी, माजी सरपंच विजय दत्तात्रय पाटील, शिवसेनेचे विलास चौधरी (किटू नाना) यांच्या पॅनल विरोधात भगवान पाटील, नवल पाटील यांचे पॅनल उभे ठाकले आहे. सरळ लढत होणार असून, मंगळवारपासूनच आता प्रचार रॅली सुरु होणार आहेत.

Web Title: Challenges Four seats of G.P.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.