शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण पूरक वटपौर्णिमा साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 13:29 IST

धार्मिक : मंदिरात पूजेसाठी महिलांची गर्दी

जळगाव : पती-पत्नीचे नाते जन्मोजन्मी अखंड रहावे अन् जन्मोजन्मी हाच पती मिळू दे.. अशी प्रार्थना करत शहरात विविध ठिकाणी रविवारी वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. काही ठिकाणी सामाजिक संस्थातर्फे वटपोर्णिमेनिमित्त महिलांना वटवृक्षाच्या रोपट्यांचे वितरण आणि रोपणही करण्यात आले.पौराणिक कथेनुसार सत्यवान आणि सावित्री यांच्या आयुष्यात आलेल्या एका प्रसंगाभोवती हा पौर्णिमेचा दिवस गुंफला गेला. त्यानुसार वटपोर्णिमानिमित्त शहरातील विविध मंदिरांमधील व चौकांमधील वडाच्या झाडाखाली सकाळपासूनच महिलांची गर्दी दिसून आली. पारंपारिक पद्धतीने महिलांनी वडाच्या झाडाला धाग्याचे सात फेरे बांधत तिथे उपस्थित महिलांनी आब्यांचे वाण दिले. नविन बस स्थानकासमोरील चिमुकले राम मंदिरात असणाऱ्या वडाच्या झाडाखाली महिलांनी मोठ्या संख्येने पूजेसाठी गर्दी केली होती. दादा महाराज जोशी यांनी यावेळी उपस्थित महिलांना वटसावित्रीची पूजा व महत्व सांगितले. तसेच अयोध्या नगरातील हनुमान मंदिरातील वडाच्या झाडाखाली महिलांनी सकाळपासूनच पुजेसाठी गर्दी केली होती. तर गणेश कॉलनी, जुने जळगाव, शिव कॉलनी, नवीपेठ, रिंग रोड, महाबळ, अयोध्यानगर व इतर परिसरात असणाºया वडांच्या झाडांखाली दिवसभर पूजेसाठी महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली.स्वामी समर्थ केंद्रातर्फे जलपुर्नभरणदिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रातर्फे वट सावित्री पोर्णिमेनिमित्त, स्वामी समर्थ केंद्राच्या छतावरील पाणी जमिनीत मुरविण्यासाठी केंद्राच्या परिसरात जल पुर्नभरण करण्यात आले. यावेळी वट पौर्णिमानिमित्त महिलांनी वडाचे पूजन केले. यावेळी विजय साळुंखे , संगीता महाजन, जयश्री पाटील , साधना पाटील, मनीषा पाटील, अर्चना पाटील, श्री स्वामी समथर् केंद्राचे पर्यावरण प्रतिनिधी वसंत पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर प्रतिनिधी योगेश इंगळे, युवा प्रतिष्ठानचे विलास कुमावत, व बिबा नगर केंद्राचे सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.नीर फाऊंडेशनतर्फे वटवृक्षाचेरोप वाटपपर्यावरणाच्या संरक्षणासाठी नीर फाऊंडेशनच्या वतीने वटपोर्णिमेनिमित्त ओकारेश्वर मंदिर येथे महिलांना वटवृक्षाच्या रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष सागर महाजन, निलेश जोशी, रोहित सोनवणे, शेखर वाघ, श्रीहरी सोनार, भैरवी जैन, देवेंद्र महाजन, आयुषी कामदार, निलेश निंबाळकर, स्नेहा पाटील , सचिन खैरनार उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव