पोलीस ठाण्यात शिक्षक दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:21 IST2021-09-06T04:21:19+5:302021-09-06T04:21:19+5:30
पोलीस ठाण्यात साजरा झाला शिक्षक दिन कासोदा : नवा पायंडा, शिक्षक भारावले कासोदा : शाळांमध्ये तर हा दिवस म्हणजे ...

पोलीस ठाण्यात शिक्षक दिन साजरा
पोलीस ठाण्यात साजरा झाला शिक्षक दिन
कासोदा : नवा पायंडा, शिक्षक भारावले
कासोदा : शाळांमध्ये तर हा दिवस म्हणजे खास सेलिब्रेशनच असते. विद्यार्थी शिक्षक होतात आणि प्रत्यक्ष वर्गात शिकवतातही. मग यादरम्यान झालेल्या गमतीजमती आपल्याला आयुष्यभर आठवतात. यंदा कासोदा पोलीस ठाण्यात सपोनि नीता कायटे यांनी हद्दीतील सर्व शिक्षकांना सकाळी पोलीस ठाण्यात बोलावून सर्वांचा सत्कार करुन सन्मानित केले. हा अनपेक्षित व असा उपक्रम पहिल्यांदाच येथे राबविला गेल्याने सर्वच गुरुजन भारावले गेले होते.
आपल्या संस्कृतीची अमूल्य गुरु-शिष्य महान परंपरा उत्तमरीत्या समजून घेऊन समाज निर्माणात आपले सहयोग प्रदान करावे, अशाच आठवणी आम्हाला पोलीस स्टेशनच्या देखील असाव्यात, म्हणून शिक्षक दिनासारख्या शुभ सोहळ्यात आम्ही कासोदा पोलीस स्टेशनतर्फे हा सन्मान करण्याचा निर्णय घेतला, अशा भावना यावेळी नीता कायटे यांनी व्यक्त केल्या आहेत.
सुरुवातीला डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक प्रमोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मोठ्या संख्येने आलेल्या सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पीएसआय नरेश ठाकरे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भारती विद्यामंदिराचे राजेंद्र ठाकरे यांनी केले, यावेळी कासोदा-आडगावसह सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक बांधव उपस्थित होते. अँग्लो उर्दूच्या शिक्षक असोसिएशनच्या वतीने नीता कायटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी क. न. मंत्री
विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय बोरसे, भारती विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका वंदना चौधरी, नांदखुर्दे जि. प.चे मुख्याध्यापक भगवान गढरी, बांभोरीचे मुख्याध्यापक पांडुरंग चौधरी, नाना चौधरी, दीपक बावस्कर, पी. एल. मोरे, आर. व्ही. वाणी, एस. एस. पाटील, अजिज शेख बारी, मुक्तार शेख , तैय्यब खान, मुनाफ अली, तहकील खान, शकील खान, मोहमीन खान, शरीफ खान, खालिद अली चौधरी, वाणी, पी. डी. रंवदळेसह चाळीस शिक्षक बांधव उपस्थित होते. आभार पीएसआय नरेश ठाकरे यांनी मानले.