शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

सीसीआयची आजपासून खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 13:18 IST

जळगाव : शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी जोर धरू लागल्यानंतर अखेर जिल्ह्यात गुरुवारपासून सीसीआयकडून खरेदीला सुरुवात होणार ...

जळगाव : शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी जोर धरू लागल्यानंतर अखेर जिल्ह्यात गुरुवारपासून सीसीआयकडून खरेदीला सुरुवात होणार आहे. आव्हाणे व पाचोरा या ठिकाणी खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. दोन दिवसात खान्देशात २० हून अधिक कें द्र सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सीसीआयकडून देण्यात आली आहे.यंदा अवकाळी पावसामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. कापसात ओलाव्याचे कारण देत खासगी कापूस विक्रेत्यांकडून हमीभावापेक्षा तब्बल एक हजार ते दीड हजार कमी दराने कापूस खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी गेल्या पंधरा दिवसांपासून केली जात होती. अखेर सीसीआयकडून कापूस खरेदीला गुरुवारपासून सुुरुवात होणार आहे. सीसीआयकडून आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात खरेदी केंद्र सुरुहोत होते. मात्र, यंदा महिनाभर उशिराने सीसीआयचे खरेदी केंद्र सुरु झाले आहेत.उडीद, मूग खरेदीचाही मुहूर्त सापडला४जिल्हा मार्केटींग व बाजार समितीकडून गुरुवारपासून उडीद, मूग व सोयाबीन खरेदीलाही सुरुवात होणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी यांनी ‘लोकमत’ला दिली. दरम्यान, जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या भरडधान्य खरेदी केंद्रांवर शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी सुरु असून, लवकरच भरड धान्य खरेदीलाही सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात १२ तालुक्यांच्या ठिकाणी शेतकी संघांमध्ये हे केंद्र राहणार आहे.४उडीदला ६ हजार ५०० रुपये इतका हमीभाव निश्चित करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र ५ हजार ५०० रुपयांपर्यंत इतका भाव दिला जात आहे. मूगाचा हमीभाव ७ हजार ५० इतका दर असून, ६ हजार रुपयांपर्यंत दर दिला जात आहे. तर कापसाला ५ हजार ५०० रुपये प्रतीक्विंटल इतका भाव असताना शेतकºयांना केवळ ४ हजार ५०० रुपये इतका भाव दिला जात आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव