CCI purchase from today | सीसीआयची आजपासून खरेदी
सीसीआयची आजपासून खरेदी

जळगाव : शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी जोर धरू लागल्यानंतर अखेर जिल्ह्यात गुरुवारपासून सीसीआयकडून खरेदीला सुरुवात होणार आहे. आव्हाणे व पाचोरा या ठिकाणी खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. दोन दिवसात खान्देशात २० हून अधिक कें द्र सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सीसीआयकडून देण्यात आली आहे.
यंदा अवकाळी पावसामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. कापसात ओलाव्याचे कारण देत खासगी कापूस विक्रेत्यांकडून हमीभावापेक्षा तब्बल एक हजार ते दीड हजार कमी दराने कापूस खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी गेल्या पंधरा दिवसांपासून केली जात होती. अखेर सीसीआयकडून कापूस खरेदीला गुरुवारपासून सुुरुवात होणार आहे. सीसीआयकडून आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात खरेदी केंद्र सुरुहोत होते. मात्र, यंदा महिनाभर उशिराने सीसीआयचे खरेदी केंद्र सुरु झाले आहेत.

उडीद, मूग खरेदीचाही मुहूर्त सापडला
४जिल्हा मार्केटींग व बाजार समितीकडून गुरुवारपासून उडीद, मूग व सोयाबीन खरेदीलाही सुरुवात होणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी यांनी ‘लोकमत’ला दिली. दरम्यान, जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या भरडधान्य खरेदी केंद्रांवर शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी सुरु असून, लवकरच भरड धान्य खरेदीलाही सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात १२ तालुक्यांच्या ठिकाणी शेतकी संघांमध्ये हे केंद्र राहणार आहे.

४उडीदला ६ हजार ५०० रुपये इतका हमीभाव निश्चित करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र ५ हजार ५०० रुपयांपर्यंत इतका भाव दिला जात आहे. मूगाचा हमीभाव ७ हजार ५० इतका दर असून, ६ हजार रुपयांपर्यंत दर दिला जात आहे. तर कापसाला ५ हजार ५०० रुपये प्रतीक्विंटल इतका भाव असताना शेतकºयांना केवळ ४ हजार ५०० रुपये इतका भाव दिला जात आहे.

Web Title:  CCI purchase from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.