मारहाण प्रकरणी लूट व दंगलीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 00:16 IST2019-02-14T00:15:56+5:302019-02-14T00:16:11+5:30

तिघांवर जबरी लूट केल्याचा व दंगलीचा गुन्हा

 In the case of assault, loot and riot cases filed | मारहाण प्रकरणी लूट व दंगलीचा गुन्हा दाखल

मारहाण प्रकरणी लूट व दंगलीचा गुन्हा दाखल

अमळनेर : दारूच्या नशेत दोघांना मारहाण करून एकाच्या खिशातून दोन हजार रुपये व १५ ग्रॅम सोन्याची साखळी काढून नेल्याप्रकरणी चौघांसह इतर तिघांवर जबरी लूट केल्याचा व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोईवाडा भागातील विशाल दशरथ चौधरी यांनी पोलिसात फिर्याद दिली की, विनोद रामचंद्र लांबोळे, राहुल लांबोळे, नीलेश भोई, राजेंद्र प्रकाश महाजन यांच्यासह इतर दोन ते तीन जणांनी १३ रोजी पहाटे पाचपावली मंदिर चौकात गर्दी करून विशाल चौधरी यांना मारहाण करणे सुरू केले. त्यांनी ताबडतोब मंगेश महाजन व मनोज शिंगाणे यांना बोलावले असता विनोद लांबोळे व राजेंद्र महाजन यांनी मनोज शिंगणे व विशाल यास लोखंडी फायटरने मारहाण केली आणि खिशातील दोन हजार रुपये रोख व ४० हजार रुपये किंमतीची १५ ग्रॅम सोन्याची साखळी काढून घेऊन पळून गेले. अमळनेर पोलिसात चौघांविरुद्ध जबरी लूट व दंगलीचा गुन्हा नोंदविण्यात आला.

Web Title:  In the case of assault, loot and riot cases filed

टॅग्स :Jalgaonजळगाव