जळगावात कार, दुचाकी अपघातातील जखमी महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 12:27 IST2019-04-03T12:25:13+5:302019-04-03T12:27:05+5:30

भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या सुनंदाबाई विजयसिंग पाटील (६१, रा. कल्याणे खुर्द, ता.धरणगाव) यांचा बुधवारी सकाळी आठ वाजता उपचार सुरु असताना जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Car accident in Jalgaon; Death of a woman in a two-wheeler accident | जळगावात कार, दुचाकी अपघातातील जखमी महिलेचा मृत्यू

जळगावात कार, दुचाकी अपघातातील जखमी महिलेचा मृत्यू

ठळक मुद्दे महामार्गावर खोटे नगरजवळ झाला होता अपघात पंधरा दिवस मृत्यूशी झुंज


जळगाव : भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या सुनंदाबाई विजयसिंग पाटील (६१, रा. कल्याणे खुर्द, ता.धरणगाव) यांचा बुधवारी सकाळी आठ वाजता उपचार सुरु असताना जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, सुनंदाबाई पाटील या १७ मार्च रोजी कल्याणे खुर्द येथून नातेवाईक नारायण पाटील (रा.दहिगाव, ता. पाचोरा) यांच्यासोबत दुचाकीने जळगावला येत असताना दुपारी चार वाजता खोटे नगराजवळ शहराकडून पाळधीकडे जात असलेल्या भरधाव कारने दुचाकीला धडक दिली होती. त्यात दुचाकीवरील दोघं जण जखमी झाले होते. या अपघातात सुनंदाबाई यांच्या मेंदूला जबर मार लागल्याने त्या अत्यवस्थ होत्या. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. बुधवारी सकाळी आठ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. सुनंदाबाई यांच्या पश्चात पती विजयसिंग जयसिंग पाटील, मुलगा सुमेरसिंग, कैलास व संदीप यांच्यासह सूना व नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Car accident in Jalgaon; Death of a woman in a two-wheeler accident