जळगावात मोबाईल चोरटा ‘सीसीटीव्ही’त कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 17:22 IST2019-05-26T17:21:21+5:302019-05-26T17:22:55+5:30
रात्री झोपताना गारवा असावा यासाठी हवा यावी म्हणून दरवाजा उघडा ठेवणे तरुणांना चांगलेच महागात पडले असून या उघड्या घरातून चोरट्याने दोन जणांचे महागडे मोबाईल लांबविल्याचा प्रकार उघडा दरवाजा ठेवलेल्या तरुणांच्या खोलीतून दोन मोबाईल लांबविल्याची घटना रविवारी सकाळी शिवकॉलनीत उघड झाली. चोरी करणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झालेला आहे. दरम्यान, याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगावात मोबाईल चोरटा ‘सीसीटीव्ही’त कैद
जळगाव : रात्री झोपताना गारवा असावा यासाठी हवा यावी म्हणून दरवाजा उघडा ठेवणे तरुणांना चांगलेच महागात पडले असून या उघड्या घरातून चोरट्याने दोन जणांचे महागडे मोबाईल लांबविल्याचा प्रकार उघडा दरवाजा ठेवलेल्या तरुणांच्या खोलीतून दोन मोबाईल लांबविल्याची घटना रविवारी सकाळी शिवकॉलनीत उघड झाली. चोरी करणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झालेला आहे. दरम्यान, याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवकॉलनी परिसरात विजय टॉवरजवळील प्रशांत सोले यांनी त्याचा फ्लॅट भाडे करारावर दिला आहे. या फ्लॅटमध्ये समाधान डोंगर पाटील, कोमल सुदाम पाटील (दोघे रा.अजंतीसिम ता.चोपडा), जयेश पंडीत पाटील, (भोरटेक, ता.शिरपूर), महेश पाटील, किरण पाटील (दोन्ही रा.मोहीदा ता.चोपडा) व सागर पाटील (पाडळसे ता.अमळनेर) हे तरुण भाडेकरावर राहतात. सर्व जण शहरासह परिसरातील कंपन्यांमध्ये नोकरी करतात. महेशला याला सकाळी कंपनीत जावयाचे असल्याने तो लवकर उठून ड्युटीवर निघून गेला. दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चोरट्याने झोपलेल्या तरुणांपैकी समाधान पाटील याचा १२ हजार रुपयाचा तर महेश याचा १४ हजार रुपयांचा मोबाईल लांबविला.