पारोळा येथे कॅप्टन हिंमत पाटील यांचा सेवापूर्ती सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 16:06 IST2020-01-04T16:05:28+5:302020-01-04T16:06:57+5:30

देवगाव येथील मूळ रहिवाशी कॅप्टन हिंमतराव राजाराम निकम हे भारतीय सेना दलातून ३० वर्षाच्या देशसेवेतून निवृत्त झाले. यानिमित्त त्यांचा सेवापूर्ती सोहळा येथील डी.बी.सोनारनगरमध्ये आयोजित करण्यात आला होता.

Capt. Hinmat Patil's service ceremony at Parola | पारोळा येथे कॅप्टन हिंमत पाटील यांचा सेवापूर्ती सोहळा

पारोळा येथे कॅप्टन हिंमत पाटील यांचा सेवापूर्ती सोहळा

पारोळा, जि.जळगाव : तालुक्यातील देवगाव येथील मूळ रहिवाशी कॅप्टन हिंमतराव राजाराम निकम हे भारतीय सेना दलातून ३० वर्षाच्या देशसेवेतून निवृत्त झाले. यानिमित्त त्यांचा सेवापूर्ती सोहळा येथील डी.बी.सोनारनगरमध्ये आयोजित करण्यात आला होता.
अध्यक्षस्थानी माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील होते. आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.
व्यासपीठावर ग.स.सोसायटीचे अध्यक्ष मनोज पाटील, जिल्हा परिषद सदस्य डॉ.हर्षल माने, प्राचार्य बागुल, माजी सभापती मनोराज पाटील, डॉ.शांताराम पाटील, भय्यासाहेब पवार, कृउबा संचालक चतुर पाटील, बाळू पाटील, दिगंबर पाटील, मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे, नायब तहसीलदार पंकज पाटील, गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे, नगरसेवक पी.जी.पाटील, माजी सभापती सुभाष पाटील, सुखदेव पाटील, माजी पोलीस पाटील नारायण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कॅप्टन पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
मान्यवरांची शुभेच्छापर भाषणे झाली. सूत्रसंचालन पाटील यांनी केले. आभार सुनील पाटील यांनी मानले.
 

Web Title: Capt. Hinmat Patil's service ceremony at Parola