वाकोद येथे कँडल मार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 17:06 IST2021-01-04T17:06:36+5:302021-01-04T17:06:47+5:30

वाकोद येथील रविंद्र नामदेव महाले (२७) याचा निर्घृण खून करण्यात झाला होता. त्यांना त्यांच्या मित्रमंडळींनी कॅंडल मार्च काढून श्रध्दांजली वाहण्यात आली.

Candle march at Wakod | वाकोद येथे कँडल मार्च

वाकोद येथे कँडल मार्च

ठळक मुद्देआतापर्यंत पाच आरोपींना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

वाकोद, ता. जामनेर : येथील रविंद्र नामदेव महाले (२७) याचा निर्घृण खून करण्यात झाला होता. त्यांना रविवारी कॅंडल मार्च काढून श्रध्दांजली वाहण्यात आली.

या घटनेत पाच आरोपींना पहूर पोलिसांनी अटक केली आहे. रविंद्र महाले याचा मित्र परिवार व नातेवाईकांना गोतावळा मोठा असून वाकोद गावी रविंद्र यांना श्रद्धांजलीचे मोठमोठे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. रविवारी रविंद्र महाले यांच्या मित्रांनी व नातेवाईकांनी संबंध वाकोद गावातून कँडल मार्च काढतआठवडे बाजार परिसरात श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

Web Title: Candle march at Wakod