शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

जळगावात जि.प. शाळेच्या बेंचेसची निविदा प्रक्रिया रद्द करण्याची शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 1:18 PM

वादात सापडल्याने निर्णय

ठळक मुद्दे७० शाळांना १७५० पॉलिमर बेंचेसअटी शर्ती तपासून निर्णय

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २० - मानव विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक मराठी शाळांना प्लॅस्टिकचे पॉलिमर बँचेस पुरविण्याची निविदा वादात सापडल्याने व तक्रारी येत असल्याने ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याची शिफारस शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी केली आहे. अटी शर्ती डावलून काढण्यात आलेल्या या निविदेत आतापर्यंत तीन कंत्राटदारांनी बेंचेसचे नमुने शिक्षण विभागाकडे सादर केले आहे.९७ लाखांच्या कामांसाठी निविदा ‘मॅनेज’ करण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर एका प्रतिस्पर्धी निविदाधारकाने थेट आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यामुळे आमदारांनी देखील निविदा रद्द करण्याची मागणी केल्याने ही प्रक्रिया वांध्यात सापडली.७० शाळांना १७५० पॉलिमर बेंचेसजिल्ह्यातील ७ तालुक्यातील शाळांना बँचेस वाटप करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यातील १० शाळांना प्रती शाळा २५ पॉलिमर बँचेस मिळणार आहे. एकंदरीत ७ तालुक्यातील ७० शाळांना १७५० पॉलिमर बेंचेस या कार्यक्रमांतर्गत वाटप करण्यात येणार असून प्रत्येक तालुक्यात इयत्ता पाचवी ते आठवीच्या १० शाळांना २५० बँचेस देण्यात येणार आहे.सीईओंच्या निर्णयाकडे लक्षजिल्हा परिषदेत ‘टेंडर मॅनेज’ करण्याचे प्रकरण गाजत असताना शिक्षणाधिकाऱ्यांकडून सावध पवित्रा घेत तक्रारी येत असल्याने ही निविदा रद्द करून नवीन निविदा प्रक्रिया राबविण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे यावर आता मुख्य कार्यकारी अधिकारी काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.मानव विकास कार्यक्रमांतर्गत पॉलिमर बेंचेससाठी ९७ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. मुदतीत निविदा प्रक्रियेत तृप्ती उद्योग, वरद इंटरप्राईजेस व रितेश स्टिल या तीन निविदाधारकांनी जि.प.च्या शिक्षण विभागाकडे बेचेंसचे नमुने सादर केले आहे.दरम्यान, याबाबत शिक्षणधिकाºयांनी मात्र नमुनेच सादर झाले नसल्याचे सांगितले. मात्र त्यांच्या दालनाच्या अ‍ॅण्टी चेंबरमध्ये तीनही कंपन्यांचे नमुने ठेवण्यात आले असल्याचे दिसून आले.निविदा प्रक्रीया राबविताना संबंधित कंत्राटदाराचे नाव गुपीत ठेवले जाते. विशेषत: सर्वात कमी दराची जी निविदा असते त्यास काम दिले जाते. मात्र शिक्षण विभागाच्या निविदा प्रक्रियेत तीनही फर्मचे नाव व पत्ते निविदा मंजूर होण्याअगोदर उघड झाले आहे. तसेच शिवसेनेकडूनदेखील या निविदांबाबत आक्षेप घेतला असल्याचे गटनेते रावसाहेब पाटील यांनी सांगितले.अटी शर्ती तपासून निर्णय घेऊपॉलिमर बेंचेस पुरविण्याच्या निविदेत तक्रारी आल्या असून शिक्षणाधिकाºयांनीदेखील निविदा रद्दची शिफारस केली आहे. येत्या दोन दिवसात अटी शर्ती तपासून या निविदेबाबत निर्णय घेवू तसेच याबाबत सीईओंशी चर्चा करून त्यांच्याकडून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांनी सांगितले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदJalgaonजळगाव