जळगावातील १४६ संवेदनशील केंद्रांवर कॅमेऱ्याची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 22:45 IST2018-07-31T22:43:47+5:302018-07-31T22:45:51+5:30

महापालिका निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून संवेदनशील इमारत, केंद्रांचे व्हिडीओ चित्रण केले जाणार आहे.

Camera monitoring at 146 sensitive centers in Jalgaon | जळगावातील १४६ संवेदनशील केंद्रांवर कॅमेऱ्याची नजर

जळगावातील १४६ संवेदनशील केंद्रांवर कॅमेऱ्याची नजर

ठळक मुद्देपोलिसांचा बंदोबस्त झाला रवाना१०० वाहनांद्वारे जळगाव शहरात पेट्रोलिंगकर्मचा-यांना पुरविणार जागेवरच जेवण

जळगाव : महापालिका निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून संवेदनशील इमारत, केंद्रांचे व्हिडीओ चित्रण केले जाणार आहे. शहरातील हद्दीत ३५ इमारतीत १४६ केंद्र संवेदनशील आहेत. मतदान यंत्राच्या ठिकाणी मंगळवारी सकाळीच ९ वाजता बंदोबस्त रवाना झाला तर मतदान केंद्रांवर दुपारी चार वाजता बंदोबस्त रवाना करण्यात आला आहे. दरम्यान, बंदोबस्तावर असलेल्या कर्मचाºयांना बुधवारी जागेवरच जेवण पुरविले जाणार आहे.
मतदान प्रक्रिया निर्भयपणे पार पडावी व कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहचू नये यासाठी पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेले गुन्हेगार, ज्यांच्यापासून परिसरात धोका निर्माण होऊ शकतो अशा लोकांना आधीच शहराबाहेर पाठविण्यात आले आहे.

Web Title: Camera monitoring at 146 sensitive centers in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.